ढेबेवाडी कृष्णाकाठ वृत्तसेवा: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PSE) इयत्ता चौथी, २०२६ मध्ये जि. प. प्राथमिक शाळा पानवळवाडी येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
या परीक्षेत कु. वरद नवनाथ गार्डी आणि कु. निलांबरी मनोज मोरे यांनी यश मिळवून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत भर घातली आहे. त्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक, पालक तसेच शाळा व्यवस्थापन यांच्या सहकार्यामुळे हे यश मिळाले असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत मिळविलेले हे यश कौतुकास्पद आहे.
दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांकडून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.
