विजयनगरच्या महाकाली विकास सेवा सोसायटीचा ठराव माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) यांच्या नावाने बहुमताने मंजूर


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा: विजयनगर येथील महाकाली विकास सेवा सोसायटी लि.च्या सभेत मंगळवार, दि. ४ ऑगस्ट २०२६ रोजी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीसाठी माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) यांच्या नावाने ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. सोसायटीचे चेअरमन, व्हाइस चेअरमन व संचालक मंडळाने एकमताने हा ठराव मंजूर केला.

यावेळी उपस्थित पदाधिकारी व सभासदांनी माजी आमदार आनंदराव पाटील (नाना) यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. सहकार क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय योगदान तसेच शेतकरी हितासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करत हा निर्णय घेण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सभेस सोसायटीचे चेअरमन नवनाथ यादव, व्हाइस चेअरमन शिवाजीराव जाधव, विश्वासराव पाटील, भरत संकपाळ, दगडू यादव, शशिकांत कुमठेकर, धनंजय शीलवंत, सौ. अलका पाटील, सचिव जहीर मुल्ला, तसेच मुंडे गावचे माजी सरपंच आनंदराव जमाले, माजी सरपंच रमेश लवटे, विजयराव कदम, वसंतराव पाटील, दिलीपराव पाटील, नागेंद्र कोरे, माजी सरपंच संजय शीलवंत यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार व्हा. चेअरमन शिवाजीराव जाधव यांनी मानले.