गुणवत्तापूर्ण बांधकामाचा विश्वासार्ह ब्रँड – SR Constrruction


कोल्हापूर जिल्ह्यात बांधकाम क्षेत्रात गुणवत्ता, विश्वास आणि उत्कृष्ट कार्यपद्धतीच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे SR Constrruction हे आज अनेकांच्या पसंतीचे नाव बनले आहे. 2014 साली श्री. संकेत रेळेकर यांनी सुरू केलेल्या या व्यवसायाने गेल्या दशकभरात निवासी व व्यावसायिक बांधकाम क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे.

स्वप्नातील घर उभारण्यापासून ते व्यावसायिक प्रकल्प पूर्ण करण्यापर्यंत प्रत्येक कामामध्ये दर्जा आणि नियोजनाला प्राधान्य देणे ही SR Construction ची खासियत आहे. रो-बंगले, स्वतंत्र बंगले, निवासी संकुले तसेच विविध कमर्शियल प्रोजेक्ट्सच्या बांधकामामध्ये कंपनीने आपली मजबूत छाप निर्माण केली आहे. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन संपूर्ण घराचे बांधकाम, सिव्हिल वर्क, सेंट्रींग, इलेक्ट्रिकल कामे, इंटिरिअर तसेच फिनिशिंगपर्यंत सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात.

SR Construction कडे अनुभवी अभियंते, कुशल सुपरवायझर्स, सेंट्रींग तज्ज्ञ, इलेक्ट्रिशियन, इंटिरिअर कारागीर आणि बांधकाम क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळाची सक्षम टीम कार्यरत आहे. त्यामुळे प्रत्येक प्रकल्प वेळेत, सुरक्षिततेच्या निकषांनुसार आणि उच्च दर्जा कायम ठेवत पूर्ण केला जातो.

सध्या कोल्हापूर परिसरात नयरा पेट्रोल पंपजवळ बलिंगा रोड, बोन्द्रे नगर, डी. वाय. पाटील हॉस्पिटलजवळील कदमवाडी तसेच शिंगणापूर परिसरात विविध बांधकाम प्रकल्प यशस्वीपणे सुरू आहेत. या प्रकल्पांमधील कामाचा दर्जा आणि व्यावसायिक कार्यपद्धतीमुळे ग्राहकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

ग्राहकांचा विश्वास, पारदर्शक व्यवहार, वेळेचे काटेकोर नियोजन आणि दर्जेदार काम या चार स्तंभांवर SR Construction ची वाटचाल सुरू आहे. याच बळावर कंपनीने कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच आता सातारा, कराड आणि सांगली या भागांमध्येही विस्तारास सुरुवात केली आहे. कोल्हापूरमधील यशस्वी प्रकल्प आणि गुणवत्तापूर्ण कार्यपद्धती पाहून सातारा व सांगली जिल्ह्यातील ग्राहकांकडूनही कंपनीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

बांधकाम क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, कुशल मनुष्यबळ आणि ग्राहककेंद्रित सेवा यांचा संगम घडवत SR Construction भविष्यात अधिक व्यापक स्तरावर काम करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. गुणवत्तेची तडजोड न करता ग्राहकांच्या अपेक्षांपेक्षा अधिक मूल्य देण्याचा कंपनीचा प्रयत्न आजही कायम आहे.

आज SR Construction हे केवळ एक बांधकाम व्यवसाय नसून विश्वास, गुणवत्ता आणि वचनबद्धतेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. ग्राहकांच्या स्वप्नांना भक्कम पाया देत, आधुनिक बांधकाम क्षेत्रात नवे मापदंड निर्माण करण्याचे कार्य SR Construction सातत्याने करत आहे.

___________________________

"प्रत्येक बांधकाम हा आमच्यासाठी केवळ एक प्रकल्प नसून ग्राहकांच्या स्वप्नांचा पाया असतो. गुणवत्तापूर्ण काम, वेळेचे नियोजन आणि ग्राहकांचा विश्वास यांनाच आम्ही सर्वाधिक महत्त्व देतो. कोल्हापूरमध्ये मिळालेल्या विश्वासाच्या जोरावर आता सातारा, कराड आणि सांगली परिसरातही दर्जेदार बांधकाम सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."

संकेत रेळेकर, 
संस्थापक , SR Construction
संपर्क : 9860748780

____________________