‘२१-०’चा जल्लोष; कृष्णा कारखान्यात सहकारची हॅटट्रीक

सभासदांनी पुन्हा दिला कौल; डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब.



कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : रेठरे येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणूक २०२६ मध्ये सहकार पॅनेलने सलग तिसऱ्यांदा सत्ता कायम राखत २१ पैकी २१ जागांवर विजय मिळवत ऐतिहासिक हॅटट्रीक केली आहे. कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेलने एकहाती वर्चस्व सिद्ध केले. तर संस्थापक पॅनेलच्या सर्व उमेदवारांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला.

सहकार व संस्थापक पॅनेलच्या उमेदवारांना मिळालेली मते व अंतिम निकाल पुढीलप्रमाणे :

ऊस उत्पादक गट क्र. १ (सर्वसाधारण) – वडगाव हवेली-दुशेरे-विंग

सहकार पॅनेल (विजयी)

धोंडीराम जाधव (दुशेरे) – २४,८६८

दुर्योधन खबाले (विंग) – २४,१०८

जगदीश जगताप (वडगाव हवेली) – २३,७६८

संस्थापक पॅनेल (पराभूत)

आनंदा जगताप – १०,२०८

प्रताप जगताप – १०,०४८

दुर्योधन खबाले – ९,४३७

ऊस उत्पादक गट क्र. २ (सर्वसाधारण) – कार्वे-काले

सहकार पॅनेल (विजयी)

अरविंद पाटील (आटके) – २४,८५१

दयाराम पाटील (काले) – २४,१०८

बाजीराव थोरात (कार्वे) – २३,४७५

संस्थापक पॅनेल (पराभूत)

संतोष थोरात – १०,०२२

प्रतापराव पाटील – १०,३६३

शांताराम पाटील – ९,८०२

ऊस उत्पादक गट क्र. ३ (सर्वसाधारण) – तांबवे-नेलें

सहकार पॅनेल (विजयी)

दत्तात्रय देसाई (वाठार) – २४,६७८

लिंबाजी पाटील (तांबवे) – २४,०४४

संभाजीराव पाटील (नेलें) – २३,९६३

संस्थापक पॅनेल (पराभूत)

सुरेश पाटील – ९,९४४

सुभाष पाटील – १०,३१७

किरण पाटील – १०,०८९

ऊस उत्पादक गट क्र. ४ (सर्वसाधारण) – बोरगाव-रेठरे हरणाक्ष-कामेरी

सहकार पॅनेल (विजयी)

जयवंत मोरे (रेठरे हरणाक्ष) – २४,६३९

सत्यजित पाटील (बोरगाव) – २४,०४०

सुनील पाटील (कामेरी) – २३,९५७

संस्थापक पॅनेल (पराभूत)

जयकर शिंदे – ९,९२५

अशोक पाटील – १०,११६

उदयसिंह शिंदे – ९,८१९

ऊस उत्पादक गट क्र. ५ (सर्वसाधारण) – येडेमच्छिंद्र-वांगी-देवराष्ट्रे

सहकार पॅनेल (विजयी)

संग्राम पाटील (येडेमच्छिंद्र) – २४,१७२

बाबासी शिंदे (देवराष्ट्रे) – २२,९५३

संस्थापक पॅनेल (पराभूत)

माणिकराव मोरे – १०,१९४

सुरेश पाटील – १०,०६०


ऊस उत्पादक गट क्र. ६ (सर्वसाधारण) – रेठरे बुद्रुक-शेरे-शेणोली

सहकार पॅनेल (विजयी)

डॉ. सुरेश भोसले (रेठरे बुद्रुक) – २४,८०९

बाजीराव निकम (शेरे) – २१,९२५

संस्थापक पॅनेल (पराभूत)

अविनाश मोहिते – ११,४५६

दीपक कणसे – ९,६७७

महिला राखीव गट

सहकार पॅनेल (विजयी)

सुजाता जाधव (कपिल) – २३,४७९

सुनीता शेवाळे (सवादे) – २१,८७४

संस्थापक पॅनेल (पराभूत)

अर्चना मोहिते – ११,८९६

विजया पाटील – १०,२१७

अनुसूचित जाती-जमाती राखीव गट

सहकार पॅनेल (विजयी)

छगन कांबळे (कोळे) – २४,६५८

संस्थापक पॅनेल (पराभूत)

सुधीर रोकडे – १०,५९९

भटक्या विमुक्त जाती-जमाती राखीव गट

सहकार पॅनेल (विजयी)

अविनाश खरात (खरातवाडी) – २४,५१५

संस्थापक पॅनेल (पराभूत)

दिलीप गलांडे – १०,५६१

इतर मागास प्रवर्ग राखीव गट

सहकार पॅनेल (विजयी)

बाळासाहेब जगताप (कोडोली) – २५,०१०

संस्थापक पॅनेल (पराभूत)

प्रकाश श्रीखंडे – १०,२७६

अंतिम निकाल : सहकार पॅनेल – २१ जागा | संस्थापक पॅनेल – ० जागा (२१-०)

सलग तिसऱ्यांदा २१-० अशी निर्विवाद आघाडी घेत सहकार पॅनेलने कारखान्यातील आपले वर्चस्व कायम राखले असून, संस्थापक पॅनेलला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही.