रामकृष्ण वेताळ यांच्या हस्ते शिल्पकारांना ५ लाखांचा धनादेश सुपूर्द
उंब्रज येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याच्या कामाला वेग आला असून, हा पुतळा संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब ठरणार आहे. या पुतळ्याच्या माध्यमातून भविष्यातील प्रत्येक पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि विचारांची प्रेरणा मिळेल, असे मत भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी व्यक्त केले.
उंब्रज येथे शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याचे काम सुरू आहे. या पवित्र कार्यासाठी समाजातील सर्व घटकांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र येत मदतीचा हात द्यावा, तसेच हिंदू धर्मासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी समाजाने ठामपणे उभे राहावे, असे आवाहनही रामकृष्ण वेताळ यांनी केले.
या पुतळा उभारणीसाठी रामकृष्ण वेताळ यांनी २ लाख २२ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. तसेच शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुतळा साकारणाऱ्या शिल्पकारांना ५ लाख रुपयांचा धनादेश त्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून किल्ले रायगड राजसदरवरील श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मेघडंबरीतील प्रसिद्ध मूर्ती साकारणारे शिल्पकार सतीश घार्गे यांना हा धनादेश प्रदान करण्यात आला.
यावेळी संतोष बेडके, शरद जाधव, रणजीत कदम, महेश जाधव, अभिजीत जाधव, विनोद जाधव, अमोल कांबळे, तुषार पाटील, कृष्णात जाधव, सूरज जाधव, मधुकर जाधव, वसंतराव पाटील, महेशकुमार जाधव, जयवंत जाधव, शरदराव पाटील, युवराज चव्हाण (कालगाव), संदीप घाडगे, माऊली धुमाळ, संग्राम जमदाडे, अमोल पवार, योगेश आफळे (मसूर), जीवन जाधव, अमित बर्डे, बाळासाहेब पाटणे, पांडुरंग सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
