जागतिक महिला दिनानिमित्त कर्तुत्ववान महिलांचा जन सहकार पतसंस्थेकडून सन्मान


कराड |कृष्णाकाठ वृत्तसेवा: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जन सहकार पतसंस्थेच्या वतीने कराड शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाद्वारे समाजातील महिलांच्या योगदानाचा गौरव करत त्यांना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम राबविण्यात आला.

या प्रसंगी कराड शहर पोलीस स्टेशनच्या पीएसआय रेखा देशपांडे मॅडम यांचे जन सहकार पतसंस्थेच्या संचालिका सौ. नयन सावंत यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान कराड शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या उद्योजक महिलांचाही विशेष सन्मान करण्यात आला. महिलांनी उद्योग, व्यवसाय आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन जन सहकार पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष मारुतीराव मोळावडे तसेच संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. महिलांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देणे, समाजामध्ये त्यांचा सन्मान वाढवणे आणि महिलांना पुढे येण्यासाठी प्रेरणा देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

कार्यक्रमाला शहरातील मान्यवर, महिला उद्योजिका तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.