गुरुकुल निवासी विद्यालय, घोगाव चे NMMS परीक्षेत दैदिप्यमान यश; १९ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र.

घोगाव (ता. कराड) प्रतिनिधी :

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षा २०२५-२६ मध्ये मातोश्री प्रतिष्ठान, मलकापूर संचलित गुरुकुल निवासी विद्यालय, घोगाव यांनी यशाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. विद्यालयातील तब्बल १९ विद्यार्थी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले असून परिसरात विद्यालयाचे कौतुक होत आहे.

या परीक्षेत कौस्तुभ कुलकर्णी (११७ गुण), वेदांत पवार (९६), शौर्य सातपुते (९४), प्रांजल जाधव (९२), अथर्व झाकडे (८७), प्रसाद अमरुतराव (८२), लक्ष्मण धुमाळ (८२), वरद मोरे (८०), यश देसाई (७७), प्रज्वल मास्के (७७), आदेश कडेकर (७६), प्रेम सारक (७६), ऋषिकेश काकडे (७६), सोहम कोकरे (७५), श्रेयस बिचुकले (७५), समीर येवले (७४), आयुष खडांग (७४), अथर्व जवीर (६५) आणि सोहम थिटे (६२) यांनी यश संपादन केले आहे.

विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम आणि शिस्तबद्ध तयारीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री. सुधीर पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मार्गदर्शनामुळेच ही यशस्वी कामगिरी शक्य झाली असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.

विद्यालयाच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून भविष्यातही शैक्षणिक गुणवत्तेची ही परंपरा अधिक भक्कम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.