कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील कुपवडे गावचे सुपुत्र दिवंगत सहदेव शिवा तांबे. लेखक, पत्रकार, चित्रकार ते सामाजिक कार्यकर्ता अशा विविध कलागुणांनी सर्वगुणसंपन्न असलेले एकमेव व्यक्तिमत्व. कुपवडे सारख्या एका छोट्या खेडेगावात जन्म घेऊन आपल्या विवेक आणि कुशाग्र बुद्धीने त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. याच गोष्टींच्या आधारावर त्यांनी मुंबईमध्ये स्थायिक होऊन मुंबई पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटल येथे कर्मचारी म्हणून सेवानिवृत्ती होईपर्यंत सेवा केली. मुंबई पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये एक विशेष व्यक्तिमत्व म्हणून "पत्रकार तांबे" या नावाने त्यांनी एकमेव छाप सोडली. मुंबई पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटलपासून ते हेडऑफिसपर्यंत सर्व डिपार्टमेंटमध्ये, कामगार युनियन, मुंबई वृत्तपत्र लेखक संघ, पंचायत समिती, कला आणि सांस्कृतिक मंडळे, यांसारख्या अनेक ठिकाणी आणि सामाजिक संस्थांमध्ये आपल्या स्वकर्तुत्वावर आणि कलागुणांच्या सहाय्यतेने एकमेव आणि विशेष व्यक्तिमत्व म्हणून ओळख निर्माण केली.
मुंबई पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये कार्य करत असताना देखील त्यांनी विविध सामाजिक संस्थेसाठी आणि इतर लोकांसाठी, रुग्णांसाठी, गरजूंसाठी स्वतःच्या जीवनातील अमूल्य वेळ देऊन सामाजिक हितासाठी शेवटपर्यंत लढत राहिले. कोणत्याही गोष्टीचे भान न ठेवता, पारदर्शकतेने कार्य करून, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून, आपले स्वतःचे कार्य सतत चालूच ठेवले.
महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील तालुक्यातील आणि गावांमध्ये शहरांमध्ये प्रकाशित होणाऱ्या मासिकांमध्ये, वर्तमानपत्रांमध्ये, दैनिकांमध्ये, मासिकांमध्ये, वार्षिकांमध्ये विविध विषयांवर आधारित आपले स्वलिखित लेख प्रकाशित करून सामाजिक अडचणींना आणि विषयांना वाचा फोडून आपले व्यक्तिगत मत शब्दरूपी अलंकारांतून मांडले आणि त्यांच्या या सर्व गोष्टींना विविध स्तरांवरून मान्यता मिळाली आणि त्यांच्या या प्रित्यर्थ योगदानाबद्दल विशेष कौतुक करून महाराष्ट्र राज्यस्तरीय पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यासोबतच महाराष्ट्राचे राज्यस्तरीय मानाचे पुरस्कार म्हणजे कोकणरत्न पुरस्कार, उत्कृष्ट लेखक पूरस्कार, समाजरत्न पुरस्कार, उत्कृष्ट वृत्तपत्र लेखक पुरस्कार, कलाभूषण पुरस्कार, उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार, रायगडरत्न पुरस्कार, इत्यादी.
मुंबई सीएसटी या ठिकाणी "भुयारी मार्गाची आवश्यकता" हा त्यांच्या आयुष्यातील आठवणीचा विशेष लेख आणि ही मागणी विविध वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित होऊन त्यांनी त्याचा पाठपुरवठा मंत्रालयमधून केला असता. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी विशेष दखल घेऊन मुंबई सीएसटी या ठिकाणी भुयारी मार्गाचा म्हणजेचं आताच्या सिएसटी सबवे या प्रकल्पाला मान्यता देऊन लोकार्पण केले. त्यांचं हे सामाजिक योगदान देखील एक विशेष योगदान म्हणून समाजात नक्कीच आठवणीत राहील. रायगड जिल्ह्यातील गावच्या पुलाची उंची वाढविणे, सायन हॉस्पिटलमध्ये स्वच्छता आणि दिव्यांची व्यवस्था करणे, मुंबईतील धोकादायक पुलांचे ऑडिट करून त्याचा पुनर्विकास करणे, ज्यादा रेल्वे गाड्या सोडणे, वाहतूक बसच्या फेऱ्या वाढविणे, यासारख्या अनेक सामाजिक विषयांवर आधारित लेख लिहून त्यांनी त्यांचे साहित्यिक आणि सामाजिक योगदान समाजाला दिले आणि एकमेव आदर्श निर्माण केला. त्यांचे कर्तुत्व, आठवणी आणि योगदान निरंतर सर्वांच्या स्मरणात राहिल.
अशा या थोर व्यक्तिमत्वाला शतशः नमन आणि भावपूर्ण श्रद्धांजली..!!