आप्पासाहेबांची व एल.वाय. बाबाची मैत्री म्हणजे कृष्ण सुधामाची जोडी: माजी आमदार आनंदराव पाटील

सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले व धर्मराज स्व. एल. वाय. पाटील यांना 12 व्या स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांकडून अभिवादन



कराड : सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पा) व धर्मराज एल. वाय. पाटील यांच्या 12 व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करताना माजी आमदार आनदराव पाटील, निवासराव थोरात,रंगराव थोरात, संपतराव थोरात,अनिल जाधव,सुनिल थोरात, अधिकराव गुजले, सुभाष थोरात, वैभव थोरात, महेश थोरात, कृष्णत थोरात व इतर मान्यवर

कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा: निस्वार्थीपणे मैत्रीचे नाते जपणारे आप्पासाहेब व एल.वाय बाबा यांनी समाजहिताच्या कामांना गती दिली. एल. वाय. बाबांना आप्पासाहेबांचा शब्द म्हणजे अंतिम शब्द असायंचा. अशा या थोर व्यक्तीच्या विचारांचा वारसा पुढे चालवला पाहिजे. असे प्रतिपादन माजी आमदार आनंदराव पाटील यांनी केले.

ते कृष्णाकाठच्या सहकार, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विकासाचे प्रणेते आणि कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पा) व ज्यांना कार्वे गावाने धर्मराज ही पदवी बहाल केली असे धर्मराज एल. वाय. पाटील यांच्या 12 व्या स्मृतिदिनी आयोजित मोफत सर्व रोग निदान शिबिर व मोफत औषध वाटप कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.

यावेळी सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले व धर्मराज एल. वाय. पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कृष्णा कारखान्याचे संचालक निवासराव थोरात, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन रंगराव थोरात, कृष्णा कारखान्याचे माजी संचालक संपतराव थोरात, कार्वे कामाक्षी सोसायटीचे चेअरमन अनिल जाधव, दुध डेअरीचे चेअरमन सुनिल थोरात, सरपंच अधिकराव गुजले, इंरिकेशनचे चेअरमन सुभाष थोरात, वैभव थोरात, उपसरंपच महेश थोरात, कृष्णत थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.

आनंदराव पाटील पुढे म्हणाले, सातारा जिल्ह्यातील कराड तालुका आणि सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्याच्या कृष्णाकाठचा परिसर समृद्ध आणि संपन्न आहे. या भागात विकासाचे नंदनवन उभे राहिले असून, या विकासाचे खरेखुरे शिल्पकार म्हणून सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांना ओळखले जाते. कृष्णा कारखाना, कृष्णा बँक, कृष्णा हॉस्पिटल, कृष्णा विश्व विद्यापीठ अशा संस्थांच्या उभारणीतून त्यांनी एकाचवेळी या भागात सहकार, उद्योग, आर्थिक, आरोग्य, शिक्षण अशा क्षेत्रात क्रांती घडवून आणली. ज्यामुळेच आज कृष्णाकाठी विकासाचे नंदनवन दिसून येत आहे.

तसेच स्व. एल.वाय. पाटील हे केवळ कार्यकर्ता नव्हते. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या जडण घडणीत मा. जयवंतरावजी भोसले व यशवंतराव मोहिते यांचे बरोबर सक्रीय कार्य करणारा एक तळमळीचा कार्यकर्ता म्हणून त्यांचा लौकीक होता. स्व. यशवंतरावजी चव्हाण व आदरणीय पी.डी. पाटील यांचेवर अढळ निष्टा ठेऊन जिल्ह्याच्या राजकारणात वेगळा ठसा निर्माण करणारा 11 वर्ष जिल्हा परिषद सदस्य, यशवंतराव मोहिते कृष्णा सह. साखर कारखान्याचे 35 वर्षे संचालक, व्हा. चेअरमन 6 वर्ष आणि सलग 40 वर्ष ग्रामपंचायतचे सरपंच पद भूषविणारा महाराष्ट्रातील एकमेव सरपंच! अशी त्यांची ख्याती होती. कार्यकर्ता म्हणून काम करताना कर्णाचे दानशूरपण त्यांनी जपले. एक दोन एकर नव्हेतर 28 एकर जमीन त्यांनी गोपाळ समाजाला निवाऱ्यासाठी दिली. अशा अनेक ठिकाणी त्यांनी जमिन दान केली. प्रत्येकांच्या अडीअडचणीमध्ये त्यांना मदत केले. त्यामुळेच गावाने व परिसरातील लोकांनी त्यांना धर्मराज ही पदवी बहाल केली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हिंदुराव थोरात यांनी केले तर आभार राजेंद्र थोरत यांनी मानले.

यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य कैलास जाधव, सुहास पाटील, निवास थोरात आप्पा, दिग्विजय थोरात, ॠतुराज थोरात, माजी सरपंच संदिप भाबुंरे, संताजी थोरात, वैभव थोरात, संदिप नागरे, मुन्नाभाई मुलाणी, शशिकांत थोरात, प्रमोद थोरात, जालिंदर शिंदे, अशोक थोरात, हणमंत काशिद, काकासो थोरात, एच. वाय. थोरात, बाळासो थोरात, सतिश थोरात, जयाभाउ थोरात, युवराज थोरात, वसंतराव थोरात, बापूराव थोरात, विठठल यादव, गणेश थोरात, श्रीरंग देसाई, निवास देसाई, भास्कर देसाई, भास्कर शिंदे, यांच्यासह सर्व संस्थांचे पदाधिकारी व कर्मचारी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.