महाराष्ट्र डाक सर्कल तर्फे जी. पी. सिप्पी द्वारा निर्मित शोले या हिंदी चित्रपटाचा सुवर्ण महोत्सव साजरा. ‌


मुंबई| भूषण तांबे : 
१५ ऑगस्ट १९७५ रोजी रिलीज झालेल्या शोले या चित्रपटाच्या मूळ प्रदर्शनाला आज ५० वर्षे पूर्ण झाली. 

जी.पी. सिप्पी द्वारा निर्मित या चित्रपटाने सिने जगतात आपले एक विशेष स्थान निर्माण केले आहे. या निमित्त भारतीय डाक विभाग, महाराष्ट्र पोस्टल सर्कल तर्फे काल आपण दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी एका भरगच्च कार्यक्रमात एका विशिष्ठ स्पेशल कॅन्सलेशन सह विशिष्ठ पिक्चर पोस्टकार्ड आणि एक प्रेसेंटेशन पॅक चे विमोचन करण्यात आले.  
महाराष्ट्र डाक सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल श्री अमिताभ सिंह यांनी अधिकृतपणे या स्मरणीय वस्तूंचे अनावरण केले व शोलेचे प्रशंसित दिग्दर्शक श्री रमेश सिप्पी यांना पहिला अल्बम सादर केला. 
या प्रसंगी श्री शहजाद सिप्पी, श्री रोहन सिप्पी, श्रीमती किरण जुनेजा सिप्पी आणि श्री शिवेंद्र सिंग डुंगरपूर उपस्थित होते तसेच मोठ्या संख्येने फिलॅटेलीस्ट आणि मीडिया चे प्रतिनिधी व शोले चे चाहते उपस्थित होते
या प्रसंगी भारतीय डाक विभागाचे वरिष्ठ डाक अधिकारी, श्रीमती केया अरोरा, निदेशक, डाक सेवा (मुंबई क्षेत्र), सुश्री सिमरन कौर, निदेशक (मुख्यालय), डाक सेवा, महाराष्ट्र सर्कल आणि मुंबई जी.पी.ओ. च्या संचालिका श्रीमती रेखा रिझवी देखील उपस्थित होत्या.
या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने तिकीट शोलेचे चाहते उपस्थित होते. प्रदर्शनाच्या पाच दशकांनंतरही शोलेने भारताच्या सांस्कृतिक आणि चित्रपट वारशात आपले एक विशेष स्थान कायम ठेवले आहे.