नवी मुंबई|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
सामाजिक, पत्रकारिता व रुग्णसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल धगधगती मुंबई चे संपादक भिमराव बाळकाबाई हिंदुराव धुळप यांना राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण पुरस्कार २०२५ ने गौरविण्यात आले.
हा पुरस्कार नवी मुंबईतील घणसोली येथील महापालिकेच्या सभागृहात संपन्न झालेल्या सोहळ्यात महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे संपादक व राजकीय विश्लेषक महेश म्हात्रे, विजय चोरमारे, विधानपरिषद आमदार विक्रम पाटील आणि भारत सरकारचे स्वतंत्र राज्यमंत्री दर्जाचे भरत नाना पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
आतापर्यंत महाराष्ट्रातील विविध संस्थांकडून २२ राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या श्री. धुळप यांना हा २३ वा पुरस्कार मिळाला असून, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने दिला जाणारा हा सन्मान त्यांच्यासाठी विशेष अभिमानाचा ठरला. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी व यशवंत नीतीने प्रेरित होऊन ते कार्यरत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आणि आयोजक यशवंतराव चव्हाण फाउंडेशनचे अध्यक्ष संजय सावंत व त्यांच्या टीमचे आभार मानले.
सोहळ्यात विविध क्षेत्रात कार्यरत इतर मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला. नागरिकांची मोठी उपस्थिती या गौरवक्षणाला साक्षी राहिली