पालखी सोहळ्यात पोलिस पाटील व डॉक्टरांकडून सेवाभावी उपक्रम


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात बरड (ता. फलटण) येथे भाविक व वारकऱ्यांसाठी शिवसमर्थ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी व वांगव्हॅली डॉक्टर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत वैद्यकीय सेवा देण्यात आली. तसेच महाराष्ट्र राज्य पोलिस पाटील संघ, पाटण तालुक्याच्या वतीनेही भाविकांची मनःपूर्वक सेवा करण्यात आली.

पोलिस पाटील संतोष पवार, नितीन पाटील, अमित शिंदे, विजय सुतार, बजरंग रामिष्ठे, दत्तात्रय कुंभार, विक्रम वरेकर, महादेव वरेकर, अमोल गायकवाड, दिगंबर कदम, बाजीराव येळवे, प्रवीण मोरे, गणेश डाकवे, संध्याराणी बाटे, वैशाली चव्हाण, वंदना चाळके, शैलजा बोरगे, अर्चना पाटील, सायली नांगरे, कविता चव्हाण, दिनकर मस्कर यांच्यासह डॉ. श्याम सुपनेकर, डॉ. संदीप माने, माजी मुख्याध्यापक वसंतराव हरुगडे, माजी पंचायत समिती सदस्य महादेव पानवळ आदी मान्यवरांनी या सेवाकार्यात सक्रिय सहभाग घेतला.

वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक ते औषधोपचार देण्यात आले. पोलिस पाटलांनी पालखी सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांच्या पायांना तेल मालिश करून, पाय चेपून सेवा देत खऱ्या अर्थाने सेवाभाव दाखवला.

या उपक्रमाचे उपस्थितांनी तसेच वारकऱ्यांनी विशेष कौतुक केले असून, डॉक्टर आणि पोलिस पाटील यांच्या सेवाभावी वृत्तीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.