येळगाव येथे आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यावतीने शालेय साहित्याचे वाटप

गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणास प्रोत्साहन देणारा उपक्रम



कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या वतीने येळगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील विविध गावांतील शाळांमध्ये शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. मनव, खुडेवाडी, साळशिरंबे, महारुगडेवाडी आणि जिंती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील गोरगरीब, होतकरू तसेच सर्वच विद्यार्थ्यांना हा शालेय साहित्य वाटप उपक्रम राबविण्यात आला.

दरवर्षी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी आणि शिक्षणाचा दर्जा उंचावावा या उद्देशाने डॉ. भोसले यांच्या माध्यमातून हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. यंदाही विद्यार्थ्यांना वही, पेन, पेन्सील, खोडरबर, शार्पनर यांसारख्या आवश्यक शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी उत्साह वाढला असून ग्रामीण भागात याचे सकारात्मक पडसाद उमटत आहेत.

कार्यक्रम प्रसंगी भाजपा कराड दक्षिण-पश्चिम मंडळ अध्यक्ष प्रवीण साळुंखे, भाजपा सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष पंकज पाटील, कुस्ती संघटक पै. तानाजी चवरे, मनवचे उपसरपंच दादासो शेवाळे, सेवा सोसायटीचे चेअरमन संताजी शेवाळे, महारुगडेवाडीचे सरपंच बाळकृष्ण माने, तंटामुक्ती अध्यक्ष जहांगीर शेख, साळशिरंबेचे माजी उपसरपंच जयवंतराव यादव, जिंतीचे माजी उपसरपंच जयवंतराव शेवाळे, पोलीस पाटील संतोष पाटील, कृष्णत पोळ, बापूराव पोळ, विलास चवरे, सागर विभुते, प्रदीप खुडे आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी व पालकांनी या उपक्रमाचे कौतुक करत आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांचे मनःपूर्वक आभार मानले.