सातारा | कृष्णाकाठ वृत्तसेवा: भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने सातारा जिल्ह्यातील भाजप महिला नेत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
यावेळी सिताई उद्योग समूहाच्या प्रमुख व भाजप महिला मोर्चा प्रदेश सचिव कविता कचरे, भाजपा जिल्हा सरचिटणीस मनिषा पांडे, महिला मोर्चा प्रदेश चिटणीस सुनिशा शहा, महिला मोर्चा प्रदेश सदस्य स्वाती पिसाळ आदी मान्यवरांनी विशेष अभिनंदन केले.
महिला मोर्चाच्या या सर्व नेत्यांनी रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजप अधिक बळकट होईल आणि नव्या उंचीवर जाईल असा विश्वास व्यक्त केला आहे. सर्व मान्यवरांनी आ. रवींद्र चव्हाण यांचे अभिनंदन करत त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
________________________________
“एक सच्चा कार्यकर्ता प्रदेशाध्यक्ष होतो ते फक्त भारतीय जनता पार्टीतच शक्य आहे. आजवर जे प्रदेशाध्यक्ष झाले, ते कोणाचे नातेवाईक नव्हते हे मी देवाभाऊंच्या भाषणातून ऐकले आणि स्वतः गेली अनेक वर्षे पाहात आहे. रविदादा साधी राहणी आणि उच्च विचारसरणी यांचे प्रतीक आहेत.”
- कविता कचरे,
- कविता कचरे,
भाजप महिला मोर्चा प्रदेश सचिव
________________________________