शेंडेवाडी पवारवाडी (ता. पाटण) – येथील रहिवासी आणि सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय असलेले कै. शामराव सखाराम पवार (वय ८०) यांचे गुरुवारी दिनांक २४ जुलै २०२५ रोजी रात्री ११ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
कै. पवार हे 'अण्णा' नावाने परिसरात परिचित होते. त्यांनी आपल्या आयुष्यात सामाजिक, धार्मिक आणि पारिवारिक जबाबदाऱ्या मोठ्या निष्ठेने पार पाडल्या. त्यांच्या निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते शेंडेवाडीचे पोलिस पाटील श्री. संतोष पवार व उद्योजक श्री. सुरेश पवार यांचे वडील होत.
रक्षाविसर्जन रविवारी दिनांक २७ जुलै २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता – शेंडेवाडी पवारवाडी (कुंभारगाव) येथे होणार आहे.
पवार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, ईश्वर त्यांना या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.