संजय देसाई यांच्या संकल्पनेतून कुंभारगाव व केळोली शाळांत सामाजिक उपक्रम
कार्यक्रमास मान्यवर व कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली. त्यात शंकराव चव्हाण बापू (माजी पंचायत समिती सदस्य, पाटण), संजय गुरव (माजी ग्रामपंचायत सदस्य), सुनील सुतार, बाबुराव हारूगडे (गलमेवाडी), राम जोशी, महेश ताईगडे (उपाध्यक्ष, नवभारत को-ऑप. क्रेडिट सोसायटी, तळमावले), पोपट चव्हाण, अधिकराव माने (प्रगतशील शेतकरी, मानेगाव), विजय गुरव (माजी ग्रामपंचायत सदस्य, कुंभारगाव) आदींचा समावेश होता.
केळोलीतील कार्यक्रमात आकाश कोळी (तालुका कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), अनिल सुतार, विश्वजित कोळी, यशराज कदम यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या मनोगतात संजय देसाई म्हणाले की शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेत अजितदादा पवार राज्यकारभार करीत असून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून तळागाळातील लोकांच्या अडचणी सोडवण्याचा आणि पक्षाची सदस्यसंख्या वाढवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. प्रिती गुरव यांनी केले, तर आभार सुनील सुतार यांनी मानले. कुंभारगाव जिल्हा परिषद गटातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.