पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप


पाटण : पाटण तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांसाठी उर्मी सामाजिक संस्था, पुणे आणि हिसोवा इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि., विवो पुणे यांच्या वतीने रेनकोट वाटप करण्यात आले. पाटण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मुले) येथे झालेल्या या कार्यक्रमात तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद शाळांतील सुमारे ७५० विद्यार्थ्यांना रेनकोट देण्यात आले.

कार्यक्रम प्रसंगी हिसोवा संस्थेचे व्यवस्थापक प्रतिनिधी सौम्या बक्षी, रोहित वाघळे, किरण जावळे, सुधीर अडमुठे, विवेक साळुंखे, उर्मी संस्थेचे किशोर पेडणेकर, राहुल चुनीदास, शिक्षण विस्तार अधिकारी आनंद पळसे, केंद्रप्रमुख संजय आटाळे, राजेंद्र पाटील, नारायण बागल, सुनिता नांगरे, दिलीप शिंदे, संतोष होळ तसेच विवोचे वितरक शंकर हराळे व रणजीत सावंत उपस्थित होते.

अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे येऊ नयेत यासाठी संस्थेकडून देण्यात आलेले रेनकोट उपयुक्त ठरतील, असा विश्वास आनंद पळसे यांनी व्यक्त केला. रोहित वाघळे यांनी संस्थेच्या पुढील शैक्षणिक उपक्रमांना चालना देण्याचा आश्वासही दिला.

कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदिरानगर येथील विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात रेनकोट वितरित करण्यात आले. स्वागत दिलीप शिंदे यांनी केले, प्रास्ताविक संजय आटाळे यांनी तर आभार सुनिता नांगरे यांनी मानले.