उंडाळे | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
स्मितकिरण पब्लिक स्कूल, ओंडोशी येथे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने १८ जुलै रोजी एक दिवसीय दंत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे आयोजन सामाजिक सेवा विभाग आणि स्कूल अॅण्ड हेल्थ सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन संस्थेच्या सचिव डॉ. अंजली देसाई यांच्या हस्ते व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. शिबिरात कृष्णा विद्यापीठातील नामांकित दंतचिकित्सकांनी विद्यार्थ्यांची तपासणी करून दातांची योग्य निगा कशी राखावी याबाबत मार्गदर्शन केले. दात स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व, योग्य ब्रशिंग पद्धती, आहाराचे दातांवर होणारे परिणाम याबाबत विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती देण्यात आली.
विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. या उपक्रमाचे शिक्षक आणि पालकांनी कौतुक केले. शिबिरातील सर्व डॉक्टरांचे स्वागत प्राथमिक विभाग प्रमुख मा. अलका जाधव यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक अमोल अंबपकर यांनी सर्व डॉक्टर व सामाजिक सेवा विभागाचे आभार मानत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होते, असे सांगितले.