ब्रिलियंट क्लासेस कराड चे स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश! तालुका गुणवत्ता यादीत अव्वल, ९ विद्यार्थ्यांचे जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
ब्रिलियंट क्लासेस, कराड या नामांकित इंग्रजी माध्यमातील संस्थेने यंदाच्या शासकीय स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल झळकवत तालुका व जिल्हा गुणवत्ता यादीत आपला ठसा उमटवला आहे. संस्थेतील एकूण २० विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश मिळवले असून, त्यापैकी ९ विद्यार्थ्यांनी थेट जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे.
तालुका गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकावणारी ब्रिलियंट क्लासेसचीच विद्यार्थिनी माही महेश जाधव हिने जिल्हास्तरावरही आपल्या नावाची मोहोर उमटवत १३वा क्रमांक मिळवला आहे. इंग्रजी माध्यमातून स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करून घेणारा हा तालुक्यातील एकमेव क्लास असल्यामुळे हे यश अधिक महत्त्वाचं ठरतं.

गुणवंत विद्यार्थ्यांची यादी खालीलप्रमाणे :
माही महेश जाधव – कराड तालुका प्रथम, जिल्हा गुणवत्ता यादीत १३वी
संकल्प प्रकाश गोरड – तालुक्यात ३रा, जिल्हा यादीत २५वा
अद्वैता दीपक भिसे – जिल्हा यादीत ३५वी
तन्वीराजे प्रकाश पिसाळ – इंग्रजी माध्यमातून ९२वी
श्रीराज रमेश महाडीक – ११३वा
शारिया फिरोज पटेल – १८५वी
स्वामींनी किरण देशमुख – २०४वी
सई संतोष रसाळ – २०८वी
अनुराग संतोष कांबळे – २१५वा

विशेष उल्लेखनीय यश :
मोहिते रुतिका राजेश हिने उजव्या हाताला दुखापत असल्यामुळे रायटरच्या साहाय्याने परीक्षा दिली असून, इंग्रजी माध्यम – सेट अ यामध्ये ३री आली आहे.
साठे वैदेही अमर ही विद्यार्थिनी एससी प्रवर्ग – सेट ब नुसार जिल्हा गुणवत्ता यादीत प्रथम आली आहे.

ब्रिलियंट क्लासेस – गुणवत्तेची ओळख
ब्रिलियंट क्लासेसने मागील दहा वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी केली आहे. क्लासमध्ये इयत्ता ६ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी JEE, NEET Foundation, तसेच स्कॉलरशिप, मंथन, BDS, ऑलिंपियाड, होमी भाभा इत्यादी स्पर्धा परीक्षांची अभ्यासपूर्ण तयारी गुणवत्तापूर्ण आणि अनुभवी शिक्षकांमार्फत करून घेतली जाते.

विद्यार्थ्यांसाठी मोफत सुविधा :
हस्ताक्षर सुधार कार्यशाळा
आर्टिफिशियल इंटेलिजन्स व कोडिंग
कम्प्युटर भाषेचे प्रशिक्षण
इंग्लिश स्पीकिंग व व्यक्तिमत्त्व विकास

पालकांना आवाहन :
आपल्या पाल्याला शालेय अभ्यासासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि स्पर्धा परीक्षेतील तयारीचा योग्य तो लाभ मिळवून द्यावा. ब्रिलियंट क्लासेसच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थी केवळ शिष्यवृत्ती परीक्षा नव्हे तर भावी करिअरसाठी आवश्यक असणाऱ्या JEE, NEET, आय.आय.टी., नॅशनल ओलिंपियाड यांसारख्या परीक्षांची भक्कम पायाभरणी करू शकतात.
"तयारी आजची – उज्वलता उद्याची!".