पाटण तालुका पोलीस पाटील कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा: महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या पाटण तालुका नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार समारंभ नुकताच तळमावले (ता. पाटण) येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील होते. प्रमुख उपस्थितीत उपविभागीय अधिकारी सोपान टोपें

, नायब तहसीलदार पी. डी. पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी  विजय पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त (मुंबई) संतोष पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. प्रवीण दाईगडे (ढेबेवाडी पो.स्टे.), मंडल अधिकारी नागेश निकम, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हनुमंतराव सोनवलकर, जिल्हाध्यक्ष प्रदीप गाढवे, खेड तालुका अध्यक्ष दीपक पावडे तसेच सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील पदाधिकारी व पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नूतन कार्यकारिणीमध्ये पुढील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली –
अध्यक्ष : नितीन जगन्नाथ पाटील 
उपाध्यक्ष : विक्रम दिनकर मोरे
सचिव : संग्राम पांढरपट्टे
सहसचिव : अमोल गायकवाड
सदस्य : विकास माने, बजरंग रामिस्टे, महादेव वरेकर, नितीन पाटील, संदीप भिंगारदेवे, प्रकाश लोखंडे, दिनकर कदम, संध्या बाटे, वैशाली चव्हाण, कांचन सुतार, विद्या माने

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून पोलीस पाटील संघटनेच्या कार्याबाबत आणि प्रशासनाशी असलेल्या समन्वयाबाबत मार्गदर्शन केले. मुंबई पोलीस आयुक्तालयात सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत असलेल्या संतोष पवार यांचा पाटण तालुका पोलीस पाटील संघाच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन पोलीस पाटील अमित शिंदे यांनी केले. आभार प्रदर्शन संतोष पवार यांनी मानले.