कृषी संस्कृतीला नवसंजीवनी देणारे वसंतराव नाईक : शेतीमित्र अशोकराव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली कृषी ग्रंथ प्रदर्शन उत्साहात संपन्न

मलकापूर| कृष्णाकाठ वृत्तसेवा:
समाज प्रबोधन सार्वजनिक वाचनालय मलकापूर येथे हरित क्रांतीचे प्रणेते मा. वसंतराव नाईक जयंती व कृषी दिनानिमित्त कृषी विषयक ग्रंथ प्रदर्शन उद्घाटन समारंभ मा. श्री.प्रकाश महादेव पवार यांचे शुभ हस्ते व मा. शेतीमित्र श्री अशोकराव थोरात, श्री सुनिल पवार यांचे प्रमुख उपस्थितीत नुकताच संपन्न झाला.
         कार्यक्रमाचे अध्यक्ष शेतीमित्र श्री अशोकराव थोरात म्हणाले की, आज कृषीदिन, अन्नदात्या शेतकऱ्यांचा सर्वत्र सन्मान केला जातो. कृषीप्रधान भारत म्हणून ओळखल्या जाणत्या देशात कृषी संस्कृतीचे स्मरण आणि शेतकरी कृतज्ञतेचे प्रतिक म्हणून आजच्या दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे. तरुण पिढीने शेतीकडे वळावे व शेतीत आपले करिअर करावे .तसेच शेतीमालाला योग्य भाव मिळावा असेही प्रतिपादन त्यांनी केले.
        उद्‌घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व प्रगतशील शेतकरी श्री.प्रकाश महादेव पवार म्हणाले की, शेतकरी कारखानदार झाला पाहिजे' हे वसंतराव नाईक यांचे स्वप्न, स्वप्नच राहिले. ही खंत त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. 
      शेतीविषयक ग्रंथ प्रदर्शनात विविध प्रकारची 235 शेती विषयक ग्रंथ,मासिक यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.शेतीविषयक ग्रंथ प्रदर्शनास परिसरातील शेतकरी व विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ, सभासद, श्री मळाई देवी शिक्षण संस्थेच्या विविध वि‌द्यालयातील मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, वाचक, हितचिंतकांनी भेट दिली.
कार्यक्रमास पोलीस पाटील प्रशांत गावडे, वाचनालयाच्या उपाध्यक्षा सौ.सुरेखा खंडागळे,सचिव श्री विशांत थोरात, खजिनदार श्री.मारुती फराळे,संचालक सदस्य सौ. रंजना काटवटे, श्री.सुधीर लादे,श्री दत्तात्रय शिर्के, ग्रंथपाल सौ. वैशाली शेवाळे,लिपिक शुभांगी चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सविता कोळी यांनी केले व उपस्थितांचे आभार श्री.सुधाकर शिंदे यांनी मानले.