मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या वर्धापन दिनादिवशी भाजपने एक मोठा राजकीय झटका देत पाटण तालुक्यातील महत्त्वाचे नेते आपल्याकडे वळवले. पवार गटाचे निष्ठावंत सत्यजितसिंह पाटणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय हिंदुराव पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण, साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, जिल्हाध्यक्ष आ. डॉ. अतुल भोसले, माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील आणि राजाभाऊ शेलार उपस्थित होते. पाटणकर गटातील शेकडो कार्यकर्तेही यावेळी सहभागी झाले.
ढेबेवाडी खोऱ्यात राजकीय भूकंप
पाटण तालुक्यातील दुर्गम आणि राजकीय दृष्ट्या जागरूक भाग असलेल्या ढेबेवाडी खोऱ्यात हिंदुराव पाटील यांचा मोठा प्रभाव आहे. ते गेले काही महिने काँग्रेसच्या कार्यक्रमांपासून दूर होते आणि भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर त्या चर्चांना पूर्णविराम देत त्यांनी भाजपचे ‘कमळ’ हाती घेतले.

विशेष म्हणजे काही आठवड्यांपूर्वी ढेबेवाडी येथे साईकडे चे गणेश यादव यांची भाजप तालुकाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर हिंदुराव पाटील यांनी त्यांचा सत्कार केला होता. त्या फोटोमुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या, ज्याला आता पुष्टी मिळाली आहे.
हिंदुराव पाटील यांची राजकीय वाटचाल
हिंदुराव पाटील यांनी काँग्रेस नेत्या प्रेमालाताई चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात पाऊल टाकले. त्यांनी पाटण तालुका युवक काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली. यानंतर सतत २० वर्षे जिल्हा परिषद सदस्य म्हणून प्रतिनिधित्व करत कृषी सभापतीपद भूषवले. ते सातारा जिल्हा खादी ग्रामोद्योग संस्थेचे अध्यक्ष होते तसेच ते आनंदराव चव्हाण पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. काँग्रेसचे प्रांतिक सदस्य म्हणूनही त्यांनी दीर्घकाळ काम पाहिले.

काँग्रेससाठी चिंता वाढली !
पाटण तालुका हे पारंपरिक काँग्रेसचे बालेकिल्ले मानले जात होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे मूळ गाव कुंभारगाव हेच या भागात येते. त्यामुळे या परिसरात काँग्रेसचे बळ ठाम होते. मात्र हिंदुराव पाटील यांच्यासारख्या नेत्याच्या जाण्याने काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे.

ढेबेवाडी खोऱ्यासह संपूर्ण पाटण आणि कराड तालुक्यात याचा परिणाम जाणवण्याची शक्यता असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी हा मोठा राजकीय लाभ ठरणार आहे.