पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी ‘आविष्कार फाऊंडेशन इंडिया’ तर्फे दरवर्षी ‘लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार’ प्रदान केला जातो. राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिला जाणारा हा राज्यस्तरीय पुरस्कार यंदा शिवाजीराव देसाई विद्यालय, सोनवडे (ता. पाटण) येथील मराठी विषयाचे उपशिक्षक श्री. संतोष कदम सर यांना जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार रविवार, दि. २९ जून २०२५ रोजी दसरा चौक, कोल्हापूर येथील मुख्य सभागृहात विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
संतोष कदम हे गेली १२ वर्षे मराठी विषयाचे अध्यापन करत असून, अध्यापनाबरोबरच त्यांना लेखनाचीही विशेष आवड आहे. त्यांच्या ग्रामीण पार्श्वभूमीवरील अनेक कथा विविध दिवाळी अंकांमधून प्रकाशित झाल्या आहेत.
या गौरवप्राप्तीनंतर संतोष कदम यांचे विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे पर्यटनमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज (दादा) देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, युवा नेते जयराज देसाई, आदित्यराज देसाई, संस्थेचे उपाध्यक्ष विलास कुराडे, सचिव डी.एम. शेजवळ, विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.एल. केंडे, एस.डी. शेजवळ तसेच मोरणा शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक व सेवकवर्ग यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.