स्मितकिरण स्कूलमध्ये योग दिन व विद्यार्थी निवडणूक उत्साहात साजरी


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
स्मितकिरण पब्लिक स्कूलमध्ये जागतिक योग दिन व विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक हे दोन महत्त्वाचे उपक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.

विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण व्हावी यासाठी योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. योगा सत्राचे सूत्रसंचालन गणेश लोहार व पूनम देशमुख यांनी केले. विद्यार्थ्यांनी विविध योगासनांचे सादरीकरण करून मनोबल, आरोग्य आणि शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व अधोरेखित केले.

दरम्यान, शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या नेतृत्व विकासासाठी विद्यार्थी प्रतिनिधींची निवडणूकही पार पडली. या निवडणुकीचे उत्कृष्ट नियोजन मोनाली पाटील, उर्मिला काळे, मुग्धा बर्गे, वनिता पाटील व वृषाली पाटील यांनी केले. विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत लोकशाही मूल्यांची प्रत्यक्ष अनुभूती घेतली.

सदर दोन्ही कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेच्या सचिव डॉ. अंजली देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य अमोल अंबपकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले 

या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी सजगता आणि लोकशाही प्रक्रियेबद्दल जाण निर्माण झाली.