नामदार शंभूराज देसाई गटाची एक हाती सत्ता !
बहुले ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मर्यादित, बहुले (ता. पाटण, जि. सातारा) या नामवंत संस्थेच्या निवडणुकीत ‘कै. शिवाजीराव देसाई शेतकरी विकास पॅनेल’ ने दणदणीत विजय मिळवत सत्ता परिवर्तन घडवून आणले आहे. या निवडणुकीत पॅनेलने सर्वच्या सर्व जागा प्रचंड मताधिक्याने जिंकून प्रतिस्पर्ध्यांना पूर्णपणे पराभूत केले.
या ऐतिहासिक विजयामागे महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांचे प्रभावी मार्गदर्शन आणि लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. यशराज देसाई (दादा) यांचे दूरदर्शी नेतृत्व महत्त्वाचे ठरले.
पॅनेलच्या सर्व उमेदवारांनी ठाम नेतृत्व, पारदर्शकता आणि शेतकरीहिताच्या धोरणांवर विश्वास दाखवत ग्रामस्थ व सभासदांचा विश्वास संपादन केला. या विजयामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून, कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत व पेढे वाटून जल्लोष साजरा केला.
या निकालामुळे बहुले सहकारी संस्थेत विकासाभिमुख, शिस्तबद्ध आणि कार्यक्षम नेतृत्वाची नवी सुरुवात होणार असल्याचे बोलले जात आहे. शेतकरी कल्याण व ग्रामीण विकासाच्या दृष्टीने ही निवडणूक एक निर्णायक टप्पा ठरणार आहे.