कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्याच्या 65 वर्षे पूर्तीनिमित्त कृषिभूषण गोविंदराव पवार यांनी मशालयात्रा सुरु केली. हि मशालयात्रा कराड येथे आली असता गोविंदराव पवार यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन उपक्रमाची माहिती दिली. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गोविंदराव यांना उपक्रमाबाबत शुभेच्छा देत मशाल यात्रेचे स्वागत केले. यावेळी कराड शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष, माजी नगरसेवक प्रदीप जाधव, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश नलवडे यांची उपस्थिती होती.
कृषिभूषण गोविंदराव पवार यांनी महाराष्ट्र मध्ये एक कोटी झाडे लावण्याचा कार्यक्रम हाती घेतला असून त्यांची सुरुवात त्यांनी गहोली तालुका पुसद येथून मंत्री इंद्रनील नाईक यांचे हस्ते सुरुवात केली सदर ज्योत प्रवास सुरू केला. तसेच महाराष्ट्र राज्याला समृद्ध करणारे महाराष्ट्रातील सर्व माजी मुख्यमंत्र्यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून प्रेरणादायी मशाल यात्रा सुरु केली. सदर कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी पुसद येथून प्रथम माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक यांच्या समाधीस्थळी भेट देऊन नांदेड येथे शंकरराव चव्हाण यानंतर लातूर येथे विलासराव देशमुख, शिवाजीराव निलंगेकर यांच्या समाधीस्थळी अभिवादन करत सांगली येथे वसंतदादा पाटील यांचे दर्शन घेतले त्यानंतर यात्रेच्या समारोप करताना महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कराड येथील प्रीतीसंगमवर समाधीस्थळी अभिवादन केले. यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी गोविंदराव पवार यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या उपक्रमाबद्दल माहिती दिली, तसेच त्यांचा सत्कार केला. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी गोविंदराव यांचे उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.