ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
ढेबेवाडी विभागातील एका गावात एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच ओळखीतील ३५ वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी ढेबेवाडी पोलीस ठाण्यात 'पोक्सो' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित आरोपीस अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

घटना कशी घडली?
गुरुवार, २८ मे रोजी दुपारी सुमारास ही संतापजनक घटना घडली. पीडित मुलगी आपल्या आईला फोन करण्यासाठी गावातील नातेवाईकांच्या घराजवळ आली होती. त्या घरात कोणीही नसल्याचे पाहून, तिच्याच नात्यातील ३५ वर्षीय नराधमाने तिला मोबाईल बघण्याच्या बहाण्याने जवळ बोलावले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर पीडितेला धमकी देण्यात आली की, "ही गोष्ट कुणालाही सांगितलीस, तर तुला जिवे ठार मारीन." या धमकीमुळे घाबरून गेलेल्या मुलीने सुरूवातीला काहीच बोलले नाही.

आईच्या सूजबूजेमुळे घटना उघड
आई घरी परतल्यानंतर मुलीच्या वागण्यात काहीतरी बदल जाणवला. आईने तिची समजूत घालून विचारणा केली असता, पीडित मुलीने घडलेली संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर आईने ढेबेवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

पोलीसांची तत्काळ कारवाई
तक्रारीच्या आधारे ढेबेवाडी पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधान आणि ‘पोक्सो कायदा’ अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दाईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.