प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांना शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे कृतज्ञता पुरस्कार जाहीर


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
तळमावले, ता. पाटण येथील काकासाहेब चव्हाण माजी विद्यार्थी मंडळाच्यावतीने देण्यात येणारा २०२४-२५ चा शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे कृतज्ञता पुरस्कार माजी प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांना जाहीर करण्यात आला आहे. रविवार, दि. ४ मे रोजी सकाळी १० वाजता या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

तळमावले येथील काकासाहेब चव्हाण माजी विद्यार्थी मंडळाच्यावतीने सामाजिक, सहकार, अर्थ, क्रीडा, सांस्कृतिक, साहित्य, उद्योग, पत्रकारिता, कला, शिक्षण अशा विविध क्षेत्रातील मान्यवर माजी विद्यार्थी, विभागातील मान्यवर गुरुदेव कार्यकर्ते यांना शिक्षण महर्षि डॉ. बापूजी साळुंखे कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाचा पुरस्कार विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले कला व वाणिज्य महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांना जाहीर करण्यात आला आहे. तळमावले, ता. पाटण येथील काकासाहेब चव्हाण कॉलेजमध्ये रविवार, दि. ४ मे रोजी सकाळी १० वाजता या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन सर्व कार्यकारिणी सदस्य व काकासाहेब चव्हाण कॉलेज व माजी विद्यार्थी मंडळाने केले आहे.