कुटुंबवत्सल ताईसाहेब : स्व.सौ.वत्सलादेवी देसाई( ताईसाहेब )


जिच्या हाती पाळण्यांची दोरी...
तिचं जगाचा उद्धार करी !!

        या खानदेशी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या सुवचनाप्रमाणे पाटण तालुक्यांचे भाग्यविधाते ,महाराष्ट्र राज्यांचे पोलादी पुरुष आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या सुविध धर्मपत्नी स्व.सौ.वत्सलादेवी देसाई उर्फ ताईसाहेब यांची लोकनेते बाळासाहेब देसाई शिक्षण व उद्योग समूहांच्या वतीने मंगळवार दि.२० मे २०२५ रोजी ६६ वा पुण्यतिथी सोहळा संपन्न होत आहे,त्या निमित्ताने त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन....!!

                महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यांनी पाटण तालुक्यांचे नांव महाराष्ट्राच्या नकाशावर सुवर्णक्षराने कोरलेले असे बहुआयामी व्यक्तीमत्व स्व.लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन तपाहून अधिक काळ विविध खात्यांची महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडत विकासकामाचा डोंगर उभा करून महाराष्ट्राच्या राजकारणात उत्तुंग भरारी मारली,यासाठी त्यांना त्यांच्या धर्मपत्नी स्व.वत्सलादेवी देसाई(ताईसाहेब)यांची मोलाची साथ होती.

                  सातारा जिल्ह्यांतील पाटण तालुका हा द-या-खो-यांचा,अतिदुर्गम,मागासलेला तालुका या तालुक्यातील मरळीच्या इनामदार घराण्यातील कुलदीपक लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी अनेक आपत्तीना,अनेक संकटाना,समस्यांना तोंड देवून ध्येयाप्रत अत्यंत कष्टाने व निष्ठेने आणि निकराने तोंड दिले.म्हणून आजही महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या मुखामध्ये लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे आजही नांव घेतले जाते.

       कोल्हापूर जिल्ह्यातील बेनाडी गांवचे पाटील यांनी लोकनेते साहेबांचे कार्य-कर्तुत्व,त्यांच्या कामांची पद्धत ,त्यांचे कोल्हापूरमधील महाविद्यालयीन शिक्षण,छत्रपती शाहू महाराज यांनी लोकनेते साहेंबांना शिक्षणासाठी केलेली मदत या साऱ्या गोष्टी बेनाडीकर पाटील यांना ज्ञात होत्या , हे ओळखून बेनाडीकर पाटील यांनी आपली कन्या वत्सलादेवी यांचा विवाह लोकनेतेसाहेबाबरोबर मोठ्या थाटा-माटात कोल्हापूर या ठिकाणी पार पडला.

           संसार चिमणी-पाखर सुद्धा करतात,आपलं घरट बांधतात,काडी-काडीने ,कणा-कणाने वाढवितात,पण ताईसाहेबाच्या मनानं निश्चित असा विचार केला की,राज्यांच्या प्रपंच करणारे आपले पती स्वत:च्या घर प्रपंच्यात अडकून पडणे योग्य नाही ही ताईसाहेब यांची दूरदृष्टी खरी ठरली,आणि अल्पावधीतच लोकनेतेसाहेबानी आपल्या कार्यकुशलतेच्या जोरावर विविध मंत्रीपदे भूषवून विकासकामाचा डोंगर उभारला.लोकनेते व ताईसाहेब यांच्या संसार वेलीवर पाच मुले व एक मुलगी अशी सहा मुले उमलली होती,आपल्या वडिलाप्रमाणे आपल्या कार्य- कृर्तृत्वाचा जोरावर तिही यशस्वी झालेली आहेत, जयसिंगराव,अशोकराव,शिवाजीराव,अरुणराव,शरदराव आणि मंगलताई या दांपत्यांनी लोकनेतेसाहेब व ताईसाहेब यांचे नांव उज्ज्वल केले.

        लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब १९५७ साली महाराष्ट्राच्या राजकारणात मंत्री म्हणून विराजमान झाले,व आपला सातारा येथील कोयना-दौलत निवासस्थान सोडून त्यांनी मुंबई येथील शासकीय निवासस्थान मलबार हिल वरील मेघदूत या ठिकाणी आपला संसार उभारला,यावेळी लोकनेतेसाहेब महाराष्ट्राच्या राजकारणात रत्नजडीत हि-या प्रमाणे चमकू लागले परंतु ताईसाहेब यांना या धकाधकीच्या काळात शारीरिक हाल आपेष्टाना तोंड द्यावे लागले,अशातच ताईसाहेबानी आपले पती व मुला-बाळांची कायमची साथ सोडली ,व त्या इहलोकी गेल्या,एकीकडे ताईसाहेब यांचे अकाली निधन तर दुसरीकडे मंत्रीमंडळात महत्वपूर्ण खात्यांची जबाबदारी पार पाडताना लोकनेतेसाहेबाना तारेवरची कसरत करावी लागली,यातच त्यांनी आपली मुले उच्चशिक्षीत केली.

        आपल्या नावातच वात्सल असणा-या कुटुंब वात्सल ताईसाहेबांची पुण्याई आणि भक्ती यामुळेच लोकनेते साहेबानी यशांची शिखरे गाठली,लोकनेते साहेबांनी आपल्या मंत्रीपदांच्या कार्यकाळात नोकऱ्या देवून अनेकांचे संसार फुलविले ,हे आजही पाटण तालुक्यातील जनता विसरणार नाही,हे त्रिकालाबाबत सत्य आहे.

         लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जन्म शताब्दी वर्षापासून कै.सौ.वत्सलादेवी देसाई यांची २० मे ही पुण्यतिथी साजरी करण्याचा निर्धार नामदार श्री.शंभूराज देसाई साहेब यांनी केला त्यावेळी ताईसाहेब यांच्या आदर्श विचारांची सांगड व त्यांच्या कार्याचे स्मरण व्हावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून २०१२ सालापासून २६१ पाटण विधानसभा मतदार संघातील गरीब,गरजू,होतकरू व हुशार मुलींना महाविद्यालयीन शिक्षण घेण्याकरीता आर्थिक विवंचना भासू नये हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून नामदार श्री.शंभूराज देसाईसाहेब यांनी पालकत्व स्वीकारून पदवीपर्यंत अशा मुलीना शिवाजीराव देसाई चरिटेबल ट्रस्ट दौलतनगर यांचे मार्फत कै.वत्सलादेवी देसाई उर्फ ताईसाहेब यांच्या नावाने शिष्यवृती देण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतला,त्यामुळे आज अनेक डोंगर-कपारीतील मुलीना महाविद्यालयीन शिक्षण घेता येवू लागले आहे.

         गत १४ वर्ष ही शिष्यवृती चालू असून आजअखेर २२८ मुलींना शिष्यवृतीचा लाभ मिळाला आहे, महाराष्ट्र राज्यांचे पोलादी पुरुष आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या सुविध धर्मपत्नी स्व.सौ.वत्सलादेवी देसाई उर्फ ताईसाहेब यांची लोकनेते बाळासाहेब देसाई शिक्षण व उद्योग समूहांच्या वतीने मंगळवार दि.२० मे २०२५ रोजी ६६ वा पुण्यतिथी सोहळा संपन्न होणार असून या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्यांचे पर्यटनमंत्री नामदार श्री.शंभूराज देसाईसाहेब,मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाईदादा ,लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याचे चेअरमन मा.श्री.यशराज देसाई दादा यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न होत आहे, त्या निमित्ताने पुनश्च एकदा कै.स्व. वत्सलादेवी देसाई उर्फ ताईसाहेब यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन ! 

- श्री.कदम संतोष बंडू (MA.B.Ed ,DSM)
सहाय्यक शिक्षक, शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे