(छायाचित्र. संजय बारंगळे)
पशु पक्षांना उन्हाळ्यात अन्न आणि पाणी मिळावे यासाठी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ यांच्या वतीने भोंदवडे (सातारा) येथील आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील निसर्गप्रेमींना पशुपक्षांना पाणी ठेवण्यासाठी मातीच्या भांड्यांचे वितरण नुकतेच करण्यात आले.
भोंदवडे (सातारा) येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये येथे पार पडलेल्या समारंभात पर्यावरण व निसर्ग संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी मुठभर धान्य, व पाणी या कार्यक्रमांतर्गत पशु पक्षांना पाणी व धान्य ठेवण्यासाठी मातीच्या भांड्यांचे वितरण करण्यात आले अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष प्रमोद दादा मोरे होते यावेळी प्रमुख पाहुणे सुधीर विसापूरे , राज्य उपाध्यक्षा कांचन सावंत, मोहन कवळे, सहसचिव संजय गायकवाड, आहिल्यानगरचे जिल्हा संघटक चंद्रकांत भोजने, जिल्हाध्यक्ष नामदेव जगदाळे ,उपाध्यक्षा सौ. सविता बरांगळे, सचिव दयानंद पवार, सौ. प्रज्ञा पवार, जगन्नाथ माळी, संजय बारंगळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती
यावेळी बोलताना श्री मोरे म्हणाले बदलते हवामान उन्हाची तीव्रता यामुळे पाण्याचे स्रोत आटले आहेत. नद्यांच्या अवस्था वाईट आहेत. या सर्वातून पशुपक्ष्यांना वाचवणे गरजेचे आहे त्यासाठी मुठभर धान्य व पाणी हा उपक्रम गेली पाच वर्ष मंडळाच्या माध्यमातून राबवला जात आहे पशु पक्षांना धान्य खाऊन पाणी पिताना पाहिले की मनाला समाधान मिळते यासाठी सर्वांनी एकत्र येऊन या मंडळाच्या माध्यमातून काम करावे व सातारा जिल्ह्यात हे काम प्रभावीपणे सुरू आहे.
सुधीर विसापुरे म्हणाले .झाडे सावली फळे, ऑक्सिजन, देण्याचे काम झाड करते यासाठी वृक्षाची संगोपन करणे निसर्गाचा समतोल साधने हे आपले काम आहे पर्यावरण क्षेत्रात संस्थेने चांगले काम केलेले आहे.
यावेळी पर्यावरण क्षेत्रात पर्यावरण, निसर्ग संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कांचन सावंत, हेमलता वास्के, अलका जगदाळे, विद्या पवार, जगन्नाथ माळी, संजय बारंगळे यांना शिड् व वृक्ष देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच यावेळी महिलांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली. या बरोबरच गोमातेचे पूजनही करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सातारा जिल्हा कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले. जिल्हा अध्यक्ष नामदेव जगदाळे प्रस्ताविक केले. सूत्रसंचालन सविता बारंगळे यांनी केले तर दयानंद पवार यांनी आभार मानले