पाटण | संतोष कदम : डिसेंबर २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या एन.एम.एम.एस. (NMMS) परीक्षेचा नुकताच अंतरिम निकाल जाहीर झाला असून, मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय, सोनवडे येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या परीक्षेत विद्यालयातील कु. तिकुडवे सान्वी दिनकर ही विद्यार्थिनी सातारा जिल्ह्यात गुणवत्ता यादीत १७व्या क्रमांकावर आली असून तिला राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण विद्यालयाचा गौरव वाढला आहे.
तसेच विद्यालयातील खालील विद्यार्थ्यांची सारथी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत निवड झाली आहे:
कु. चव्हाण वैष्णवी काशिनाथ, पाटील राजवर्धन सूर्यकांत, शेजवळ ललित आनंदा, शेजवळ गणेश अरुण, कु. शेजवळ संस्कृती हणमंत, देसाई हर्षवर्धन कैलास, कुंभार हर्षवर्धन सर्जेराव, पानस्कर सार्थक निवास, माने अभय संदीप, पवार वेदांत शिवाजी, कु. शेजवळ श्रावणी सुहास, कु. शेजवळ रिया नितीन, कु. शेजवळ अनुष्का विजय, पाटील आर्यन बाबुराव, शेजवळ अर्थव प्रकाश, खांडेकर सुषमा संतोष. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या उपशिक्षिका व स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख कु. मणेर एस.एस., डोंगरे एस.एस. आणि कदम आर.एन. या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई दादा, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई दादा, युवा नेते जयराज देसाई दादा, आदित्यराज देसाई दादा, लोकनेते बाळासाहेब देसाई फाउंडेशनचे सचिव एन.एस. कुंभार, संस्थेचे उपाध्यक्ष विलास कुराडे, सचिव डी.एम. शेजवळ, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक पी.एल. केंदे, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती, तसेच आजी व माजी विद्यार्थी यांनी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.