कु.शौर्या कदम स्पर्धा परीक्षेत राज्यात तृतीय.
पाटण|कृष्णाकाठ वृत्तसेवा: ध्येय प्रकाशन ॲकडमी महाराष्ट्र यांच्या वतीने जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत सुयश मेडिकल अँड चॅरिटेबल सोसायटी संचलित,रघुकुल बालमंदिर व प्राथमिक विद्यालय नाडे नवारस्ता या विद्यालयातील इयत्ता २री मध्ये शिकत असणारी कु. शौर्या संतोष कदम ही विद्यार्थिनी राज्य गुणवत्ता यादीत तिसरी आलेली आहे, याबद्दल तिचे रघुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.श्री.विजय देसाई सर,संस्थेचे सचिव सौ. डॉ.रूपाली देसाई मॅडम, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सविता सुर्वे , मार्गदर्शक शिक्षक श्री.महेश पाटील सर, विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग,आजी माजी विद्यार्थी पालक यांनी तिचे अभिनंदन केले, व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या