कराड : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांचा 78 वा वाढदिवस 17 मार्च रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होत आहे. वाढदिवसानिमित्त माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) हे वाढदिवसानिमित्त पाटण कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानी सकाळी ११ वाजले पासून शुभेच्छा स्वीकारणार असल्याची माहिती कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली आहे.
पृथ्वीराज बाबांच्या वाढदिवसानिमित्त सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी पुष्पगुच्छ हार तुरे न आणता शैक्षणिक उपयोगी साहित्य आणावे असेही आवाहन करण्यात आले आहे.