ब्रिलियंटचा प्रणव कणसे देशात 6 वा
सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, कराड या नामांकित संस्थेच्या विद्यार्थ्यांनी लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (एल.पी.यू.), पंजाब परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. प्रणव संदीप कणसे याने ४०० पैकी ३८८ गुण मिळवत देशात सहावा क्रमांक पटकावला आहे. तसेच, अंकलेश मलबिंग राजपिरोहित यानेही ३८८ गुणांसह देशात सातवा तर अवंतिका किशोर पिसे हिने ३८८ गुण मिळवत देशात दहावा क्रमांक मिळवला आहे. अंकलेश राजपिरोहित आणि अवंतिका पिसे यांना गणित विषयातील गुणांनुसार राष्ट्रीय रँकमध्ये अनुक्रमे सातवा आणि दहावा क्रमांक मिळाला आहे. तसेच दोघेही ७०% स्कॉलरशिपसाठी पात्र ठरले आहेत.
या परीक्षेत संस्थेच्या इतर विद्यार्थ्यांनीही उत्तुंग यश मिळवले आहे. प्रतीक बाळकृष्ण माळी १५ वा, अनन्या गायकवाड १७ वी, शिवम समाधान वाकडे ४१ वा, आर्य विकास डोंब ५७ वा, सुमितराज चंद्रकांत यादव ६० वा, आर्यन मोहन पाटील ६१ वा, काजल ज्योतीराम कुंभार १०९ वी, उम्मेरुमान फिरोज मुजावर ११९ वा, गौरव महेश भोसले १३३ वा आणि वरद श्रीकांत देशपांडे १४८ वा क्रमांक मिळवून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. एकूण ५६ विद्यार्थी ‘कॅटेगरी A’ (७०% स्कॉलरशिप), १० विद्यार्थी ‘कॅटेगरी B’ (५०% स्कॉलरशिप), आणि ३ विद्यार्थी ‘कॅटेगरी C’ (४०% स्कॉलरशिप) साठी पात्र ठरले आहेत.
संस्थेच्या अध्यक्ष, सचिव, प्राचार्य आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध परीक्षांमध्ये सातत्याने घवघवीत यश मिळवत ब्रिलियंट अकॅडमीने आपली उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
ब्रिज कोर्स – उज्ज्वल भविष्यासाठी पहिला टप्पा!
ब्रिलियंट अकॅडमी, कराडतर्फे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ब्रिज कोर्स सुरू करण्यात येत आहे. जेईई, नीट, एनडीए, आर्किटेक्चर आणि डिफेन्स रिसर्च यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या कोर्सचे वर्ग १ एप्रिलपासून सुरू होत असून, एनसीईआरटी पॅटर्ननुसार दर्जेदार प्रशिक्षण दिले जाणार आहे.
यासोबतच, ६ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन स्कूल कोर्स १५ एप्रिलपासून सुरू होत आहे. जेईई, नीट, एनडीए आणि संशोधन क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी सुरुवातीपासूनच योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.
मर्यादित प्रवेश असल्याने पालकांनी आपल्या पाल्यांची त्वरित नोंदणी करावी आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या संचालक मंडळाने केले आहे.