माळवाडीत कुस्ती सामना रंगला, ओंकार चौगुलेने मारली बाजी


 प्रथम क्रमाकांच्या कुस्तीतील विजयी मल्ल ओमकार चौगुले यास विजयी घोषित करताना लक्ष्मण शिरसट, विकास शिरसट, उत्तम शिरसट, मनोज शिरसट आदी.

शिराळा | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
माळवाडी (ता. शिराळा) येथील श्री घोड़ावली देवीच्या यात्रे निमित्त आयोजित केलेल्या कुस्ती मैदानातील प्रथम क्रमांकांच्या कुस्तीमध्ये संग्राम सालूँखे विरुद्ध ओमकार चौगुले अशी लढत सुरु असतानाच संग्राम सालूँखे जखमी झाल्याने ओमकार चौगुले यास विजयी घोषित करण्यात आले. दुसऱ्या नंबरची कुमार पाटील विरुद्ध समाधान गोरड अशी कुस्ती वीस मिनिटे चालल्यानंतर ती गुणावर घेण्यात आली. समाधान याने पहिला गुण घेतल्याने त्यास विजयी घोषित करण्यात आले.तिसऱ्या क्रमांकांची दत्ता बनकर विरुद्ध श्रीकांत गव्हाणे या कुस्तीत दत्ता ने श्रीकांत वर हात काढून घिस्सा डा वाने मात केली.चार नंबर ची सूरज पाटील विरुद्ध प्रतिक मेहतर या लढतीत सूरज ने प्रतिक वर एकचाक डावाने विजय मिळवला. पाच नंबरच्या लढतीत अनिरुद्ध पवार याच्यावर ऋतुराज शेटके ने विजय मिळवला. इतर विजयी मल्ल असे मयूर पाटील, सचिन महागावकर, विवेक लाड,रितेश गावडे,सौरभ नांगरे,प्रणव पाटील, शुभम पाटील,ओमकार जाधव,रोहित पोळ,सारंग पावले,ओमकार पवार,अमित कारंडे, प्रेम मोहिते,रोहित जाधव,विकास जाधव,शुभम जाधव,राजवीर पाटील, प्रणव शिरसट, राजवर्धन पाटील,तनुज पडवळ,अथर्व पाटील,अमित बेंगडे.पंच म्हणून शिवाजी लाड, आनंदराव पाटील, मारुती पाटील, राहूल पाटील, तानाजी चवरे, संजय पाटील, अशोक पावले, अमर शिरसट, रणधीर कडवेकर, सुभाष सावंत, अमर आस्कट यांनी काम पाहिले.मैदानाचे संयोजन मनोज शिरसट,शंकर शिरसट,तानाजी शिरसट,भरत शिरसट, तानाजी शिरसट,बाळू वाघमारे, महेश शिरसट यांनी केले तर निवेदक म्हणून सुरेश जाधव, विकास शिरसट यांनी काम पाहिले. मैदानात यशवंत ग्लूकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक,युवा नेते विराज नाईक,मनसे जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत,अलॉम्पिक वीर बंडा पाटील.शिव छत्रपती पूरस्कार प्राप्त नजरुद्दीन नायकवडी,उपमहाराष्ट्र केसरी शिवाजी लाड,माथाडी नेते बबनराव चिंचोलकर, सरपंच पोपट सावंत, उपसरपंच अजित शिरसट, उत्तम शिरसट,युवा नेते प्रतापसिंह चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते संजय शिरसट, आंनदराव पाटील,डॉ. अशोक आटूगड़े,माजी बाजार समिती सदस्य दिनकर दिंडे,मेनी यात्रा कमेटी अध्यक्ष महादेव आस्कट,युवा नेते मनोज चिंचोलकर, राजू पाटील तानाजी चवरे, माजी सरपंच संपत कडवेकर, पोपट पाटील,जगन्नाथ कांबळे, विजय शिरसट,दत्ता शिरसट, महादेव शिरसट,शिवाजी वाघमारे, मारुती शिरसट आदी प्रमुख उपस्थित होते.