रघुनाथ माटेकर यांचे दुःखद निधन

कुंभारगांव |कृष्णाकाठ वृत्तसेवा: कुंभारगाव ता. पाटण येथील माटेकरवाडीतील रहिवासी कै. रघुनाथ रामचंद्र माटेकर (आप्पा) यांचे वयाच्या 72व्या वर्षी आज दिनांक 13 मार्च 2025 रोजी सकाळी दुःखद निधन झाले. ते चिखलेवाडी ग्रामपंचायतीचे मा.सरपंच तसेच पाटण पंचायत समितीचे मा.सदस्य म्हणून कार्यरत होते. मनमिळावू स्वभाव आणि लोकहिताच्या कामामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली होती. पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे ते कट्टर समर्थक म्हणूनही परिचित होते. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. त्यांचा रक्षा विसर्जन विधी शुक्रवार, दिनांक 14 मार्च 2025 रोजी सकाळी 9 वाजता वैकुंठधाम, माटेकरवाडी येथे होणार आहे. चिखलेवाडी, कुंभारगाव विभागात या दुःखद घटनेने शोककळा पसरली आहे.