श्री संतकृपा अभियांत्रिकीच्या १२ विद्यार्थ्यांना डुकाटी एनर्जियामध्ये नोकरीची संधी.


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
घोगाव तालुका कराड येथील श्री संतकृपा अभियांत्रिकी महाविद्यालयातील अंतिम वर्ष इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन करण्यात आले होते. या प्रक्रियेत डुकाटी एनर्जिया इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या नामांकित कंपनीने सहभाग घेतला आणि विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया पार पडली. या प्लेसमेंट प्रक्रियेद्वारे महाविद्यालयातील एकूण १२ विद्यार्थ्यांची यशस्वी निवड करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डुकाटी एनर्जिया इंडिया प्रा. लि. चे सहाय्यक व्यवस्थापक (एचआर आणि अॅडमिन) मनोज जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी कंपनीची माहिती विद्यार्थ्यांना दिली आणि उद्योगात काम करण्याच्या संधींविषयी विद्यार्थ्यांना जागरूक केले त्यांनी सांगितले की, "कारकिर्दीच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी पगाराकडे न पाहता उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव मिळवण्यावर भर द्यावा. ज्ञान आणि कौशल्य आत्मसात केल्यास भविष्यात उत्तम संधी आपोआप उपलब्ध होतात.

या प्लेसमेंट प्रक्रियेदरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून नोकरीच्या संधीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे नियोजन प्लेसमेंट अधिकारी प्रा. महेश रेणके, प्राध्यापिका भाग्यश्री पाटील, पुनम यादव यांनी केले.

या प्लेसमेंटमध्ये खालील विद्यार्थ्यांची डुकाटी एनर्जिया इंडिया प्रा. लि. मध्ये निवड झाली: हर्षद बाबुराव जाधव, शंभूराज आनंदा शेलार, प्राजक्ता शिर्के, करण अरविंद सुतार, ओमकार जयवंत पाटील, अनुराधा जयेंद्र पाटील, विजय जगन्नाथ पुकळे, ऋषिकेश शशिकांत शेवाळे, जयेश गणेश पाटील, प्रथमेश प्रकाश शिर्के, अस्मिता भानुदास पाटील आणि संकेत सुरेश पवार.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा डॉ उषा जोहरी, सचिव प्रसून जोहरी, संचालिका सौ. प्राजक्ता जोहरी, प्राचार्य डॉ.स्वानंद कुलकर्णी सर्व प्राध्यापकवृंद व कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रात उत्तम संधी मिळाल्यामुळे त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने हा मोठा टप्पा आहे. महाविद्यालयाने आयोजित केलेल्या या कॅम्पस प्लेसमेंटमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणानंतर त्वरित नोकरीची संधी उपलब्ध झाली असून, त्यांचे स्वप्न साकार झाले आहे.