मालदन ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने ना. शंभूराज देसाई यांचे स्वागत


तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
पाटण विधानसभा निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल मतदारसंघातील मतदारांचे आभार मानण्यासाठी ना. शंभूराज देसाई यांनी विभागवार आभार दौऱ्याचे आयोजन केले आहे. या दौऱ्याचा एक भाग म्हणून ना. शंभूराज देसाई मालदन गावात आले.

यावेळी मालदन ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. उपस्थित बंधू-भगिनींचे आभार मानत नामदार शंभूराज देसाई यांनी सांगितले की, "आपण सर्वांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरवणार असून पाटण मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध राहणार आहे."

या कार्यक्रमाला ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, सोसायटीचे चेअरमन व सदस्य, शिवसेनेचे पदाधिकारी तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.

नामदार शंभूराज देसाई यांच्या स्वागतासाठी मालदन, जाधवाडी, पानवळवाडी, टेळे वस्ती, वरचे आवाड येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.