तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी (गुढे) येथे सालाबादप्रमाणे श्री विठ्ठल-रखुमाई वार्षिक भंडाऱ्यानिमित्त भव्य नामजप यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, ३० डिसेंबर २०२४ पासून बुधवार, १ जानेवारी २०२५ पर्यंत हा मंगलमय उत्सव संपन्न होणार आहे. पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या परमार्थ सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ह.भ.प. सुप्रियाताई मोरे. ढेबेवाडी, ह.भ.प. श्रीपाद महाराज, सातारा, ह.भ.प. विजय महाराज, मालदन या कीर्तनकारांची कीर्तन सेवा होणार आहे.
दैनंदिन कार्यक्रमाचे वेळापत्रक:
• पहाटे ४ ते ६: काकड आरती
• सकाळी ७: श्री विठ्ठल-रुखुमाई अभिषेक
• सकाळी ९ ते १० व दुपारी ३ ते ४: नामजप
• दुपारी ४ ते ५: हरिपाठ
• रात्री ७ ते ९: हरिकीर्तन
• रात्री ९ ते १०: संतपंगत व नंतर जागर
• सकाळी ७: श्री विठ्ठल-रुखुमाई अभिषेक
• सकाळी ९ ते १० व दुपारी ३ ते ४: नामजप
• दुपारी ४ ते ५: हरिपाठ
• रात्री ७ ते ९: हरिकीर्तन
• रात्री ९ ते १०: संतपंगत व नंतर जागर
मुख्य कार्यक्रम (१ जानेवारी २०२५):
सकाळी ११ वाजता श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर मान्याचीवाडी येथून काळंबादेवी भव्य दिंडी सोहळा आयोजित केला आहे. दुपारी ४ ते ५.३० वाजता ह.भ.प विजय महाराज मालदन यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. सायंकाळी ५.३० ते ६:०० वाजता दहीहंडी सोहळा, सायं ६ ते ७ वाजता आरती, व नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

हळदी-कुंकू समारंभ:
मंगळवार, ३१ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १ ते ३ दरम्यान हळदी-कुंकू समारंभ होईल.

मोफत आरोग्य तपासणी शिबीर:
शिव आरोग्य सेवा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि शिवसमर्थ परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, ३१ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ यावेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सर्वसामान्य तपासण्या, ईसीजी, ब्लड प्रेशर, ब्लड शुगर तपासणी, तसेच मोतीबिंदू निदान व मोफत ऑपरेशन सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.

भाविक भक्तांनी या भक्तिमय आणि आरोग्यदायी उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विठ्ठल रुक्माई गणेश मंडळ मान्याचीवाडी यांनी केले आहे.