सलग 17 व्या वर्षी मळाई ग्रुपचा आदर्श रक्तदान उपक्रम
सलग 17 व्या वर्षी श्री मळाई ग्रुप मलकापूर यांचे मार्फत आयोजित रक्तदान शिबिरास पंचक्रोशीतून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून नुकत्याच झालेल्या रक्तदान शिबिरात सर्वोच्चांकी 366 रक्तदात्यांचे योगदान लाभले.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन हृदयरोग तज्ञ डॉ.विजयसिंह पाटील, यांचे शुभ हस्ते शेती मित्र अशोक थोरात,डॉ.स्वाती थोरात,मलकापूर नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते अजित थोरात चंद्रकांत टंंकसाळे, मा.एम.एस. जाधव,डॉ.माने,यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
रक्त कृत्रिम रित्या तयार करता येत नाही. प्रत्यक्ष मनुष्यानेच ते दान केल्यास गरजू रुग्णांना उपयोगी येते. ॲनीमिया,थॅलेसेमिया,थ्रोंबोसायटोपेनियम,ब्लड कॅन्सर,डेंग्यू, विविध शस्त्रक्रिया,अपघात इत्यादींमध्ये रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी रक्त आणि रक्ताचे विविध घटक लागत असतात.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर रक्ताचा प्रचंड प्रमाणात तुटवडा निर्माण होत आहे. ही गरज ओळखून मळाई ग्रुप,श्री मळाई देवी नागरी सहकारी पतसंस्था, श्री मळाई देवी शिक्षण संस्था, यांचे मार्फत मा. शेतीमित्र अशोकराव थोरात यांचे मार्गदर्शनाखाली गेले 17 वर्षे अविरतपणे ही रक्तदानाची चळवळ चाललेली आहे.
रक्तदान शिबिर उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ.विजयसिंह पाटील म्हणाले, मळाई ग्रुपने अतिशय हायजेनिक पद्धतीने रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे. त्या रक्ताचा लाभ समाजातील अनेक गरजूंना होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
मळाई ग्रुप प्रमुख अशोकराव थोरात म्हणाले, समाजातील अनेकांनी निरीच्छ वृत्तीने रक्तदान केले. त्याचा फायदा समाजातील अनेकांना होत आहे याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. मळाई ग्रुपने रक्तदाते घडवले असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या 17 वर्षांमध्ये जवळपास 4700 रक्तदात्यांनी रक्तदान केले असून 2000 रुग्णांनी पुनश्च मोफत रक्तपुरवठ्याची सुविधा अनुभवली आहे.गरजू रुग्णांना, रक्तदात्यांच्या कुटुंबीयांना,परिचितांना तात्काळ व मोफत रक्ताचा पुरवठा हे मळाई ग्रुपचे वैशिष्ट्य आहे. सदर सेवेमुळे रक्तदात्यांचा मळाई ग्रुपवरील विश्वास अधिक वृद्धिंगत होत आहे. समाजाच्या विश्वासात पात्र राहणेसाठी मळाई ग्रुप सतत कटिबद्ध राहील. रक्तदान करून मळाई ग्रुपचे ऋणानुबंध जपले बद्दल सर्व रक्तदात्यांच्या ऋणाबद्दल रक्तदान शिबिराच्या संयोजिका डॉ.सौ.स्वाती थोरात यांनी आभार व्यक्त केले.
शिबिरास माजी आमदार आनंदराव पाटील, प्रवीण परमार,भरत जंत्रे, भीमा माहूर, शेखर शिर्के,अनिल शिर्के, शिवाजीराव धुमाळ,गरुड सर, हिंदू एकता आंदोलन कराड दक्षिणचे उपाध्यक्ष संदीप मोरे यांनी सदिच्छा भेट दिली व रक्तदात्यांना शुभेच्छा दिल्या.
श्री मळाई ग्रुप, विज्ञान प्रबोधिनी कराड,श्री मळाई देवी शिक्षण संस्था, श्री मळाईदेवी ना. सहकारी पतसंस्था,आदर्श क्रीडा संस्था, यशवंत ब्लड बँक कराडचे डॉ.संदीप यादव, व्यवस्थापक अशोक यादव, महालक्ष्मी ब्लड बँक कराडच्या व्यवस्थापक विना ढापरे, डॉक्टर संदीप पाटील,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमास पंचक्रोशीतील अनेक रक्तदाते,सौ अरुणादेवी पाटील,मा.पी.जी.पाटील,मा.बी.बी.पाटील,मा.तुळशीराम शिर्के,मा.वसंतराव चव्हाण, प्रा.संजय थोरात, संकेत परमार , डॉ. सारिका गावडे, प्रशांत गावडे ,सेंद्रिय शेती कृषी भूषण पुरस्कार प्राप्त सुधीर चिवटे,कृषिभूषण पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी शंकरराव खोत, मळाई ग्रुपमधील सर्व विद्यालयांचे मुख्याध्यापक, शिक्षक, सर्व सदस्य,सौ.शारदा वाघ,विज्ञान प्रबोधिनी कराडचे सचिव महेश सावंत,सहसचिव महेश कांबळे, वैभव शिर्के,दत्तात्रय शिर्के, सिताराम कोळेकर,शिल्पा गोतपागर, सौ.अर्चना पवार,आर.व्ही.थोरात उपस्थित होते.