मान्याचीवाडी गुढे येथे ना. शंभूराज देसाई व युवा नेते यशराज देसाई यांच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन.


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
मान्याचीवाडी (गुढे), तालुका पाटण येथे ना. शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून कोयना भूकंप योजना २०२४-२५ अंतर्गत मंजूर रस्त्याच्या सुधारणा कामाचे भूमिपूजन व कोनशीला अनावरण सोहळा उद्या, १ जानेवारी २०२५, सकाळी ११ वाजता पर्यटन मंत्री शंभुराज देसाई आणि युवा नेते लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांच्या शुभहस्ते भूमिपूजन व कोनशीला अनावरण संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमासाठी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलास गोडांबे, शिवसमर्थ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन ॲड. जनार्दन बोत्रे, शिवदौलत बँकेचे संचालक नेताजी मोरे, पंचायत समिती सदस्य पंजाबराव देसाई, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालिका वैशाली शिंदे, शिवदौलत बँकेचे संचालक मधुकर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक धनाजी गुजर, माथाडी कामगार नेते आबासाहेब बोत्रे, सरपंच सौ.पद्मावती फरांडे उपसरपंच सागर पाटील , संभाजी पाटील विभागातील सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मान्याचीवाडी येथील रस्त्याच्या विकासामुळे येथील रहिवाशांचा दळणवळणाचा प्रश्न सुलभ होणार आहे यामुळे येथील ग्रामस्थांच्या मध्ये समाधानाचे वातावरण आहे.

 या कार्यक्रमासाठी मान्याचीवाडी, शिबेवाडी, गुढे, पाटीलवाडी व परिसरातील ग्रामस्थ आणि तरुण मंडळ यांनी उपस्थित राहावे असे आवाहन मान्याचीवाडी ग्रामस्थ व नवतरुण मंडळांने केले आहे.