साताऱ्याच्या मंत्र्यांचा जलवा, खातेवाटपात मिळाली ही दमदार खाती ?


सातारा | कृष्णाकाठ वृत्तसेवा: महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारात सातारा जिल्ह्यातील चार आमदारांना मंत्रिपद मिळाल्याने जिल्ह्याचे राजकीय वजन वाढले आहे.  शिवेंद्रराजे भोसले, शंभूराज देसाई, मकरंद पाटील आणि जयकुमार गोरे यांची मंत्रीपदासाठी निवड झाली असून त्यांना महत्त्वाची खाती वाटप करण्यात आली आहेत.

खातेवाटप तपशील:

शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम

शंभूराज देसाई – पर्यटन, खाण, आणि स्वातंत्र्य सैनिक कल्याण

मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन

जयकुमार गोरे – ग्रामविकास आणि पंचायत राज

जिल्ह्यासाठी महत्त्वाची जबाबदारी
या खातेवाटपामुळे सातारा जिल्ह्याला पायाभूत सुविधा, पर्यटन विकास, ग्रामविकास आणि आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रांत प्रगतीची संधी मिळेल. जिल्ह्याच्या विकासासाठी या मंत्र्यांकडून ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा आहे.

जनतेची अपेक्षा वाढली
चार मंत्र्यांच्या नियुक्तीमुळे सातारा जिल्हा राज्य पातळीवर अधिक प्रभावी ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. खातेवाटप झाल्यानंतर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस योजना आखण्याची अपेक्षा आहे.