कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
विद्यानगरमधील सैदापूर येथील ओम कॉलनीत शुक्रवारी रात्री एका किरकोळ वादाने गंभीर वळण घेतले. अक्षरा रेसिडेन्सीमध्ये घरात घुसून गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष प्रदीप घोलप (मूळ गाव निगडी, ता. कराड) आणि त्यांची दहा वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली असून सध्या त्यांच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हल्लेखोर सुरेश काळे हा अक्षरा गृहनिर्माण सोसायटीतच राहतो. शुक्रवारी रात्री 8.30 च्या सुमारास त्याने आपली दुचाकी रस्त्यावर आडवी लावली होती. यावरून घोलप आणि काळे यांच्यात शाब्दिक वाद झाला. वादानंतर काळे तिथून गेला, मात्र अर्ध्या तासात परत येऊन त्याने घोलप यांच्या घरात घुसून हल्ला केला.
घटनाक्रम:
घोलप आणि त्यांचे कुटुंब जेवत असताना दरवाजावर बेल वाजली. घोलप यांनी दरवाजा उघडल्यावर काळेने "तुमच्याशी बोलायचे आहे" असे सांगितले. घोलप यांनी "जेवण झाल्यावर बोलतो," असे सांगून त्याला आत बसण्यास सांगितले. मात्र, घोलप जेवत असतानाच काळेने गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. घोलप यांच्या चेहऱ्यावर गोळी लागली, तर त्यांच्या मुलीच्या दोन्ही हातांना गोळ्या लागल्या. आरडाओरड झाल्याने शेजाऱ्यांनी धाव घेतली व पोलिसांना कळवले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर, निरीक्षक महेंद्र जगताप आणि सहाय्यक निरीक्षक राजेश माळी यांच्यासह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवले.
पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न :
हल्ल्यानंतर काळेने स्वतःला घरात कोंडून घेतले होते. त्याच्यासोबत त्याचे कुटुंबही होते. पोलिसांनी त्याला दरवाजा उघडण्यास सांगितले, मात्र दरवाजा उघडल्यानंतर त्याने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला शांत करत ताब्यात घेतले.

घरातून साठा जप्त
संशयिताच्या घराची झडती घेतल्यावर धान्याच्या डब्याखाली लपवलेले गावठी पिस्तूल आणि 16 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

तपास सुरू
पोलिसांनी काळे याला ताब्यात घेतले असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. सुरेश काळे मूळचा तळबीड परिसरातील असून, त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची चौकशी केली जात आहे.

सुरक्षेचा इशारा:
किरकोळ वाद कधी गंभीर रूप घेईल याचा नेम नसतो. नागरिकांनी संयम राखावा व शाब्दिक वाद टाळावेत.