हणमंत सूर्यवंशी यांना पी. एच. डी पदवी प्रदान

हणमंत सूर्यवंशी यांना पी. एच. डी. पदवी प्रदान करताना मान्यवर      

उंडाळे | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
पं.दीनदयाळ उपाध्याय हिंदी विद्यापीठ वृंदावन मथुरा (एम.पी) या विद्यापीठामार्फत घोगाव ता कराड येथील श्री.बाळसिद्ध विद्यालयाचे मुख्याध्यापक .व , सातारा राष्ट्रभाषानुरागी शिक्षक सेवक सह.पतसंस्थाचे अध्यक्ष हणमंत सूर्यवंशी यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कार्याची दखल घेऊन विद्यापीठामार्फत पी. एच. डी पदवी देऊन सन्मान करण्यात आला.

 सामाजिक,शैक्षणिक व हिंदी प्रचार-प्रसार या क्षेत्रामध्ये केलेल्या कामाची दखल घेऊन इंदोर (एम.पी) येथील हॉटेल सयाजी या ठिकाणी पं. दीनदयाळ उपाध्याय हिंदी विद्यापीठा मार्फत पदवीदान कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे सेवानिवृत्त न्यायाधीश मा. श्री.देवेंद्र कुमार जैन हे होते. कार्यक्रमाचे पाहुणे विष्णुकांत कणकने जी म.प्र.शासन तसेच विशिष्ट पाहुणे उमाशंकर नारायण जी सचिव म.प्र.बाल अधिकार संरक्षण आयोग अध्यक्ष डॉ. इंदू भूषण मिश्रा, सुश्री दीपा मिश्रा डॉक्टर विश्वनाथ पाणिंग्राहि जी इत्यादींच्या उपस्थितीत पदवी देण्यात आली. कुलपती हिंदू भूषण मिश्रा यांनी सर्वांना पदवीदान झालेल्यांना शुभेच्छा दिल्या. हे यश मिळवल्या बद्दल महाराष्ट्र राज्य हिंदी अध्यापक मंडळ उपाध्यक्ष, सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष पितामह राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त .ता.का.सूर्यवंशी, ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष जयसिंगराव पाटील , संस्थेचे अध्यक्ष अँड आनंदराव पाटील , सचिव ,मा.बी आर यादव ,वसंतराव शेवाळे,बी.आर पाटील,शहानवाज मुजावर,शिवाजीराव खामकर, सर्व संचालक,घोगाव चे ग्रामस्थ विद्यार्थी,एनकुळ गावचे ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.