जन सहकार पतसंस्थेचा ६वा वर्धापन दिन उत्साहात साजरा; पारदर्शक कारभाराची यशस्वी गरुडभरारी


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
जनसहकार नागरी सहकारी पतसंस्थेने गेल्या सहा वर्षांत तालुक्यातील गरजूंना आर्थिक मदत करून स्वावलंबी बनवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तळमावले येथे संस्थेचा सहावा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 

वर्धापन दिनानिमित्त सातारा जिल्ह्याचे माजी खासदार श्रीनिवास पाटील आणि सारंग बाबा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी जनसहकार पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्ष मारुतीराव मोळावडे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने केलेल्या उल्लेखनीय कार्याची प्रशंसा केली.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, मारुतीराव मोळावडे यांनी अतिशय पारदर्शक आणि जबाबदार पद्धतीने संस्थेचे कामकाज पाहिले आहे. सहा वर्षांत त्यांनी सहकाराचे सर्व नियम पाळून सभासद, व्यापारी आणि जनसामान्यांना उत्तम बँकिंग सेवा पुरविली आहे. लवकरच जनसहकार राज्यातील आदर्श सहकारी संस्था बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वर्धापन दिनाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात वाहन वितरणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेच्या सदस्यांनी, कर्मचाऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन हा दिवस साजरा केला.



मारुतीराव मोळावडे यांनी या यशासाठी सर्व सभासदांचे, कर्मचाऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांचे आभार मानले. या वेळी बोलताना ते म्हणाले, जनसामान्यांच्या विकासाचा ध्यास घेऊन स्थापन झालेल्या या संस्थेने घेतलेली प्रगतीकारक झेप ही चोख, पारदर्शक कारभार आणि विश्वासार्हतेची पोच आहे. संस्थेमार्फत देण्यात येणाऱ्या दर्जेदार सुविधांचा लाभ ग्राहक घेत असून संस्थेच्या आर्थिक पाठबळावर अनेक कुटुंबे स्वबळावर उभी राहात असल्याचा मोठा आनंद आम्हाला आहे.

या कार्यक्रमात ढेबेवाडी विभागातील व्यापारी, वकील वर्ग, शिक्षण, सहकार, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी संस्थेस भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

या शुभप्रसंगी संस्थेचे संस्थापक / चेअरमन श्री.मारुती मोळावडे, व्हा.चेअरमन श्री.अमोल मोरे, संचालक मंडळ,सल्लागार मंडळासोबत सर्व कर्मचारी वृंद व व्यापारी बंधू उपस्थित होते.