सकारात्मकता आणि शांततेचा संदेश देत तेजज्ञान फाउंडेशनने २५ वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. या महत्वाच्या प्रसंगी सिल्वर ज्युबिली ध्यान महोत्सवाअंतर्गत २५ तासांचे अखंड ध्यान सत्र आयोजित करण्यात आले आहे, ज्याचा उद्देश आहे जीवनात शांती, माधुर्य, मानसिक संतुलन, आणि तणावमुक्ती साधणे. हे सत्र जगात शांततेचा संदेश देण्यासाठी समर्पित आहे. या अखंड ध्यानात ४०० हून अधिक शहरांतून हजारो लोक सहभागी होऊन जागतिक शांततेसाठी त्यांची ध्यानसाधना अर्पण करतील.
कार्यक्रमाचा तपशीलः
कार्यक्रमाचे नावः २५ तास अखंड ध्यान सत्र तारीखः १६ नोव्हेंबर २०२४ (सकाळी १०:१०) ते १७ नोव्हेंबर २०२४ (सकाळी ११:११ IST पर्यंत) स्थळः कै. का.ना. पालकर शाळा, पंथाचा कोट, जुन्या कृष्णाबाई मंगल कार्यालयाच्या पाठीमागे सोमवार पेठ कराड
ऑनलाइन उपलब्धताः हे ध्यान सत्र फाउंडेशनच्या सर्व ध्यान केंद्रांत आणि ऑनलाइनही उपलब्ध असेल. साधी आणि प्रभावी ध्यानतंत्रे शिकवून लोकांना त्यांच्या जीवनात संतुलन आणि सकारात्मकता आणण्यासाठी मदत करणे, तसेच जागतिक शांततेसाठी योगदान देणे, हा या सत्राचा मुख्य उद्देश आहे.
नोंदणीसाठी लिंक:
https://happythoughts.global/meditation/akhand_dhyan/
या अखंड ध्यान सत्रात आश्रमात येऊन किंवा ऑनलाइन सामील होऊन या अनमोल कार्यात सहभागी व्हा आणि ध्यानाच्या
सामर्थ्याचा अनुभव घ्या.
संपर्कः
तेजज्ञान फाउंडेशन, ज्ञान ध्यान केंद्र, तेजस्थान कराड
फोन: +91-9922275659
विश्वशांतीसाठी या ध्यान सत्रात सहभागी व्हा आणि तुमच्या जीवनात शांतता आणि सकारात्मकता निर्माण करा।