महाराष्ट्रामध्ये 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे.आम्ही विद्यार्थी आता मतदार नाही. परंतु आता मतदार असलेल्या सर्वांना आम्ही विनंती करतो की, तुम्ही आता शंभर टक्के मतदान करा. आम्ही भविष्यात तुमचा वारसा म्हणून शंभर टक्के मतदान करू.
यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी भाषणे करून मतदान न करण्याचे तोटे सांगून मतदान जागृती करण्याचे अनोखे कार्य केले.
1. शंभर टक्के मतदान न झाल्यामुळे अयोग्य उमेदवार निवडून जातात.
2. लोकशाहीबद्दल आस्था नसणारे भ्रष्ट व गुंड लोक जास्त प्रमाणात निवडून जातात.
3. अभ्यास नसणारे व महाराष्ट्रातील, समाजापुढील प्रश्न व समस्यांची जाण नसलेले उमेदवार लोकप्रतिनिधी म्हणून निवडून जातात.
याशिवाय इतर बरेच तोटे आहेत. पुन्हा एकदा आवाहन करण्यात येते की, आता तुम्ही मतदान करा आम्ही मतदार झाल्यावर नक्कीच मतदान करू.
याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.ए.एस.कुंभार, उपमुख्याध्यापक ए.बी.थोरात, पर्यवेक्षक भरत बुरुंगले,संस्थेचे सचिव,शेतीमित्र अशोकराव थोरात,संचालक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.