मलकापूर | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
आदर्श जुनिअर कॉलेज मलकापूर येथे इयत्ता बारावी विज्ञानशाखेत शिकत असलेल्या रोहन गणेश परिहार व रविराज संदीप सुतार या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात उज्वल यश संपादन केले रविराज संदीप सुतार यांनी डेरवण तालुका चिपळूण या ठिकाणी झालेल्या स्पर्धेत हॅमर थ्रो या क्रीडा प्रकारात विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला व त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली त्याचबरोबर रोहन परियार याची वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्तरावर निवड झाली यशस्वी विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार आदर्श ज्युनिअर कॉलेजच्या प्रांगणात करण्यात आला याप्रसंगी श्री मळाई देवी शिक्षण संस्थेचे सचिव अशोकराव थोरात संचालक व क्रीडाशिक्षक प्रा संजय थोरात संचालिका डॉ स्वाती थोरात प्राचार्या सौ कुंभार मॅडम विभागप्रमुख सौ पाटील मॅडम व सर्व प्राध्यापकांनी अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या याप्रसंगी बोलताना मा अशोकराव थोरात म्हणाले खेळाडूंनी क्रीडाक्षेत्रात उज्वल यश संपादन करण्यासाठी नियमित व्यायाम उत्कृष्ट पद्धतीचा आहार या बाबींकडे लक्ष देणे आवश्यक आहे ग्रामीण भागातील हे विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर सुद्धा आपल्या खेळाचे उत्कृष्ट असे प्रदर्शन करू शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.