पाटण तालुक्यात पहिला महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार पटकावणारे डाॅ.संदीप डाकवे यांचा पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या हस्ते पाटण तालुका कराड रहिवाशी मित्र मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, डाॅ.दिलीपराव चव्हाण, विजय पवार, पंजाबराव देसाई, मंडळाचे अध्यक्ष अॅड.मिलींद पाटील, सचिव शंकर पाटील, खजिनदार आप्पासाहेब मगरे, कार्याध्यक्ष शंकर देसाई, सदस्य राजेंद्र जाधव, राहुल देसाई, रफिक पटेल, बाळकृष्ण काजारी, प्रा.उत्तमराव माने व अन्य मान्यवर उपस्थित होते.
ना.शंभूराज देसाई यांनी डाॅ.संदीप डाकवे यांचे जाहीर कौतुक केले. आणि पाठीवर शाबासकीची थाप मारत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, डाॅ.संदीप डाकवे यांनी लिहलेल्या 'तात्या' पुस्तकाची प्रत ना.देसाई यांना भेट दिली. जाहीर झालेल्या पुरस्काराचे स्वरुप रु. 1 लाख 20 हजार, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व रु.15 हजार प्रवास भत्ता असे आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागाचा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार पटकावणारे डाॅ.संदीप डाकवे हे पाटण तालुक्यातील पहिले आणि सातारा जिल्हयातील पाचवे पत्रकार आहेत. हा पुरस्कार पटकावत डाॅ.डाकवे यांनी शासन दरबारी पुरस्कार मिळवण्याचा षटकार ठोकला आहे
यापूर्वी पत्रकारितेसाठी डाॅ.संदीप डाकवे यांना महाराष्ट्र शासनाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, राजमाता जिजाऊ स्वावलंबन सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, जि.प.कृषी विभाग सातारा यांचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, ग्रामीण विकास यंत्रणेचा राजमाता जिजाऊ स्वावलंबन असे पुरस्कार मिळाले आहेत.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड.मिलिंद पाटील यांनी केले. तर सुत्रसंचालन प्रा.दीपक तडाखे आणि आभारप्रदर्शन आप्पासाहेब मगरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पाटण तालुका कराड रहिवाशी मित्र मंडळाच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.