ढेबेवाडी येथे जनआक्रोश मोर्चात एल्गार बलात्कार करणारांना फाशी द्या..धर्मांतरविरोधी कायदा करा...


ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आणि महिला मुलींच्या सुरक्षिततेसाठी ढेबेवाडी येथे हिंदूंच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बलात्काऱ्यांना फाशी आणि धर्मांतराची जबरदस्ती करणाऱ्या जिहाद्यांना
ठोकून काढण्याचा एल्गार या मोर्चामध्ये पुकारण्यात आला. हिंदू महिला मुलींवर होणारे जिहाद्यांकडून अत्याचार रोखण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागते ही शरमेची बाब असून आता यापुढे धर्मासाठी लढा धर्मासाठी जगा आणि धर्मासाठीच मरा असे आवाहन मोर्चाच्या वतीने करण्यात आले. 
ढेबेवाडी विभागातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला आणि तिच्या कुटुंबीयांना धमकावणाऱ्या युवकाला फाशीची शिक्षा द्यावी त्याचबरोबर त्याला मदत करणाऱ्या त्याच्या कुटुंबीयांवरही गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी स्वाभिमानी नाभिक संघटना त्याचबरोबर हिंदुत्ववादी संघटनांनी ढेबेवाडी येथे बुधवारी मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी स्वाभिमानी नाभिक संघटनेचे राज्याचे अध्यक्ष शंकरराव गायकवाड , अनिल महाराज देवळेकर यांनी या मोर्चा वेळी उपस्थित जमावाला मार्गदर्शन केले. 
   यावेळी बोलताना शंकरराव गायकवाड म्हणाले भोसगाव येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची बाब गंभीर असून याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहिले नाही प्रशासनाबरोबरच मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनीही या बाबीकडे दुर्लक्ष केले. दिवसेंदिवस अशा घटना वाढतच असताना यावर शासनाकडून कुठलाही कठोर निर्णय घेतला जात नाही. मात्र विधानसभेपूर्वी कायद्यामध्ये सुधारणा करून धर्मांतरविरोधी कायदा अंमलात आणला पाहीजे, ज्या कुटुंबावर अन्याय झाला आहे त्यांना संरक्षण तसेच अत्याचारीत मुलीच्या भविष्याची तरतूद प्रशासनाने करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. 
अनिल महाराज देवळेकर म्हणाले यापुढे जेहाद्याचा  उत्तमात थांबला पाहिजे यासाठी हिंदूंनी द्वेष भावना बाजूला ठेवून एकत्रित येणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कायद्यानुसार समाजातील सर्व मुलींनी रणरागिनी बनून होणारा अत्याचार परतवून लावण्यासाठी खंबीर बनायला हवे. 
यावेळी ढेबेवाडी येथील झेंडा चौकातून निघालेला मोर्चा ढेबेवाडी मुख्य बाजारपेठ मार्गे बसस्टँड जवळील ढेबेवाडी पाटण रस्त्यावर थांबला तेथेच मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले यावेळी मोर्चाच्या वतीने तयार करण्यात आलेले निवेदन सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी स्वीकारले.